राहत हा नुसरत फतेह अली खान यांचा मुलगा नाही!

लोकप्रिय पाकिस्तानी गायक राहत फतेही अली खान यांचे भारतातही लाखो चाहते आहेत. अनेकांना वाटतं की राहत फतेह अली खान हे कव्वालीचे बादशाह नुसरत फतेही अली खान यांचा मुलगा आहे. मात्र, त्यांचं नातं हे बाप-बेट्याचं नसून दुसरंच आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया. 

Diksha Patil | Jan 29, 2024, 14:25 PM IST
1/7

करिअरची सुरुवात

नुसरत फतेही अली खान यांच्यासोबत राहत फतेह अली खान यांनी कव्वाली करत करिअरची सुरुवात केली होती. 

2/7

कोण आहेत वडील?

राहत फतेह अली खान यांचा जन्म पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव फर्रुख फतेह अली खान असे आहे.  

3/7

नुसरत फतेही अली खान यांच्यासोबत 'हे' नातं

राहत फतेही अली खान हे कव्वालीचे बादशाह नुसरत फतेही अली खान यांचे पुतण्या आहेत. तर काका नुसरत फतेह अली खान यांच्याप्रमाणे गायक झाले. 

4/7

संपूर्ण कुटुंब म्युजिकच्या जगात

राहत फतेह अली खान यांचं संपूर्ण कुटुंब हे म्युजिकशी संबंधीत आहे. 7 वर्षांचे असताना पासून ते त्यांचे काका म्हणजेच नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत गाणं गायचे. 

5/7

पहिला परफॉर्मन्स

राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला परफॉर्मन्स हा आजोबांच्या वर्ष श्राद्धला केला होता. त्या परफॉर्मन्सनं त्यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. 

6/7

बॉलिवूडमध्ये 'या' गाण्यातून केला डेब्यू

राहत फतेह अली खान यांनी 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पाप' या चित्रपटातील ‘लागी तुझ से मन की लगन’ नं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 

7/7

हॉलिवूडसाठी केलं काम

राहत फतेह अली खान यांनी फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. 1995 मध्ये उस्ताद नुसरत फतह अली खान आणि वडिलांसोबत मिळून ‘डेड मॅन वाकिंग’ ला म्युजिक दिलं. तर 2002 मध्ये त्यांनी ‘फोर फेदर्स’ साठी साऊंड ट्रेकचं काम केलं. तर 2006 मध्ये ‘आय एपोकेलिप्सो’ साठी साउंड ट्रॅक आणि गाणं गायलं देखील आहे. (All Photo Credit : Social Media)