चक्क सोन्याच्या अंगठीवर साकारलं राममंदिर, किंमत वाचून बसेल धक्का!

Ram Mandir On Gold Ring : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

| Jan 21, 2024, 20:01 PM IST

Ram Temple Effect On Gold : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा जल्लोष देशभर दिसून येतोय. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकांरी आपली कलाकारी दाखवण्यास सुरूवात केलीये.

1/6

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा

देशभरातील रामभक्तांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मोठा जल्लोष आहे. अशातच काहींनी भन्नाट कला सादर केल्याचं पहायला मिळतंय. 

2/6

101 किलो सोनं

राम मंदिरासाठी देशातील आणि जगभरातील कोट्यवधी भाविकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिलीये. राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं पाठवलं गेल्याची माहिती समोर आली होती.

3/6

अंगठीवर राममंदिर

अशातच आचता रामभक्तांने चक्क सोन्याच्या अंगठ्यांवर राम मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. त्यामुळे आता त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसते.

4/6

18 कॅरेट सोनं

मुरादाबादमध्ये 18 कॅरेट सोन्याच्या अंगठीवर चक्क राममंदिर साकारण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय.

5/6

एक लाख 25 हजार

या अंगठीची किंमत तब्बल एक लाख 25 हजार रुपये इतकी आहे. त्यावर अयोध्या राममंदिर असं इंग्रजीमध्ये कोरण्यात आलंय.

6/6

सोन्याचं नाणं

प्रभू श्रीरामाचं सोन्याचं नाणं, ज्यावर अयोध्येची प्रतिकृती आहे, असं नाणं देखील मार्केटमध्ये चर्चेचा विषय आहे. काहींनी याची घरपोच सुविधा देखील दिलीये.