Photo : फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचलं कपूर कुटुंब; रणबीरसोबत टीमला चीअर करताना दिसली राहा

काल 30 नोव्हेंबर शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघं त्यांची लेक राहासोबत फुटबॉल मॅच पाहण्यासाठी गेले होते. रणबीर फुटबॉलचा किती मोठा चाहता आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. त्याशिवाय रणबीर हा एका टीमचा मालक देखील आहे. यावेळी तो त्याची लेक राहासोबत त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं मॅचिंग जर्सी परिधान केली आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

| Dec 01, 2024, 11:38 AM IST
1/7

रणबीर-आलिया आणि राहा तिघेही त्यांच्या टीमला चियर करताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. 

2/7

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आणि राहानं तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते त्यांच्या टीमला चिअर करण्यासाठी मुंबईच्या ग्राऊंडवर पोहोचले होते. 

3/7

मॅत पाहताना राहा देखील तितकीच उत्साही दिसत आहे. तर टीम जिंकल्यानंतर आलियानं राहाला संपूर्ण मैदानाच्या चारही बाजूला फिरवून आनंद व्यक्त केला आहे. 

4/7

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये आलियानं पांढऱ्या रंगाचं टॅंक टॉप आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. या दरम्यान, रणबीर आणि राहानं त्यांच्या टीमची जर्सी परिधान केली आहे. त्या दोघांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

5/7

रणबीर मॅच पाहण्यासाठी बसला तेव्हा राहा त्याच्यासोबत बसली असून ती मध्येच हसताना दिसलीये. 

6/7

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत राहा ही रणबीर आणि आलियासोबत मैदानात खेळताना दिसत आहे. तर तिथे उपस्थित असलेले लोक राहाचं नाव घेताना दिसले. तर हे ऐकूण आलियाला फार आनंद झाल्याचे पाहायला मिळते. 

7/7

आलिया आणि रणबीर हे 2022 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्याचवर्षी त्यांची लेक राहाचा जन्म झाला. दरम्यान, आलियाचा जिगरा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला तर लवकरच रणबीर 'अ‍ॅनिमल'च्या सिक्वलमध्ये आणि 'रामायण' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.