रेखा आणि अमिताभ यांचं लग्न झालंय का? काय आहे ‘त्या’ रात्रीचं सत्य?

रेखा आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी आजही चर्चेत असते. या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीही उघडपणे भाष्य केलं नाही. पण त्यांच्या नात्याबद्दल इतर सहकलाकारांनी अनेक वेळा खुलासा केलाय.

नेहा चौधरी | Feb 15, 2025, 08:27 AM IST
1/10

अमिताभ बच्चन यांचं लग्न जया भादुरी यांच्याशी झालंय. पण कायम चर्चा होते ती रेखा आणि अमिताभ यांच्या लव्ह स्टोरीची. आजही त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या दोघांनी आपल्या प्रेमाची कधी कबुली दिली नाही. अमिताभ विवाहित असल्याने रेखाशी त्यांच्या नात्याला कोणतेही नाव देऊ शकले नाहीत.

2/10

दुसरीकडे रेखा यांच्यावर लिहिलेल्या रेखा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. यासिर उस्मान यांच्या या पुस्तकात यांनी रेखा यांना पहिल्यांदा 1980 मध्ये त्या रात्री सिंदूर आणि मंगळसूत्रासोबत पाहिलं.

3/10

हा दिवस होता ऋषी कपूर – नीतू सिंगच्या यांच्या लग्नाचा. यादिवशी रेखा सिंदूर आणि मंगळसूत्र घालून दिसली. त्यावेळी तिथे असलेल्या प्रत्येकाचा भुवया उंचावल्या होत्या. रेखाने लग्न केलं का अशी चर्चा सुरु झाली होती.

4/10

रेखा आणि अमिताभ यांच्याशी लग्न केलं की काय अशी चर्चा सुरु व्हायला लागली.  सर्वांचा मनात एकच प्रश्न होता, रेखाच्या कपाळावर कोणाच्या नावाचं सिंदूर आहे.

5/10

रेखाचा हा फोटो प्रत्येत मासिकांमध्ये झळकला आणि काही क्षणात व्हायरल झाला. अभिनेत्रीचा हा लूक पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. तर काहींना आनंद झाला होता.

6/10

मुकेश अग्रवाली आयुष्यातून निघून गेल्यावरही रेखा सिंदूर लावायची. एकदा रेखा यांना सन्मानित करताना राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी तिला विचारलं, तुम्ही सिंदूर का लावतात?

7/10

यावर रेखा म्हणाली की, मी ज्या शहरातून येते तिथे फॅशनसाठी सिंदूर लावते.

8/10

एका मुलाखतीत रेखा म्हणाली की, सिंदूर मला शोभून दिसते म्हणून मी सिंदूर लावते. यावर लोक याबद्दल काय विचारतात याचा मला काही फरक पडत नाही.

9/10

त्या काळात रेखा आणि अमिताभ यांची जोडी चाहत्यांना खूप आवडायची. पण अमिताभ विवाहित होते, जया यांना रेखाबद्दल कळलं. तेव्हा जया यांनी अमिताभ यांना रेखापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

10/10

जया यांच्या निर्णयानंतर रेखा आणि अमिताभ कधी एकत्र दिसले नाही. एकाही चित्रपटात आजपर्यंत त्यांनी एकत्र काम केलं नाही.