तुमची एक चूक आणि होऊ शकते मोठं नुकसान; कंपनी रोखू शकते ग्रॅच्युटीचे पैसे!

ग्रॅच्युटी ही अशी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिली जाते. एकाच कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळु शकते. 

| Nov 15, 2024, 13:12 PM IST

Gratuity Calculation: ग्रॅच्युटी ही अशी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिली जाते. एकाच कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळु शकते. 

1/7

तुमची एक चूक आणि होऊ शकते मोठं नुकसान; कंपनी रोखू शकते ग्रॅच्युटीचे पैसे!

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

 ग्रॅच्युटीची रक्कम कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर किंवा रिटायरमेंटच्या वेळी त्याने केलेल्या किती वर्ष कंपनीत काम केलंय या आधारे दिली जाते. 

2/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

 मात्र कधीकधी कंपनी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीचे पैसे देण्यास टाळाटाळ करु शकते. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी या चुका टाळाव्यात अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागेल.   

3/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

खरं तर कंपनी काहीही कारण नसताना कर्मचाऱ्यांचे पैसे रोखू शकत नाही. मात्र जर एखाद्या कर्मचाऱ्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप असतील आणि त्यामुळं कंपनीला मोठं नुकसान झेलावं लागले तर कंपनी ग्रॅच्युटीचे पैसे रोखू शकते. 

4/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

जर कंपनीला कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी रोखायची असेल तर त्याआधी पुरावे आणि कारणं दाखवावी लागतात. कंपनी जी कारणे कर्मचाऱ्यांना सांगेल त्यासाठी त्याला कारणे दाखवा नोटिस जारी करावी लागेल. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून सुनावणी होईल. कर्मचारी जर दोषी आढळला तर कंपनी त्याच्या ग्रॅच्युटीचा पैसा रोखू शकते. 

5/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

जर कंपनी किंवा संस्खा  Gratuity Ac अंतर्गंत रजिस्टर नसेल कर कर्मचारी ग्रॅच्युटी अॅक्टअंतर्गंत येत नाही. अशावेळी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळत नाही. 

6/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

5 वर्षांपर्यंत नोकरी करुनही जर कंपनी ग्रॅच्युटीची रक्कम कंपनी देत नसेल तर कर्मचारी त्या कंपनीला नोटिस पाठवू शकते. पण तरीदेखील कंपनी त्याला दाद देत नसेल तर कर्मचारी कंपनीविरोधात दावा ठोकू शकतो. या प्रकरणी जर कंपनी दोषी ठरली तर ग्रॅच्युटीची रक्कम दंड आणि व्याजसकट द्यावी लागेल.

7/7

Rules for Gratuity in which situation company can refuse to give gratuity amount

जर खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करतात, तो त्या कंपनीला कोणीतरी ग्रेच्युटीची तरतूद असते.  जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल, तर त्याची नोकरी पूर्ण 5 वर्षे मानली जाईल आणि त्याला 5 वर्षानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल. जर त्याने 4 वर्षे आणि 8 महिन्यांपेक्षा कमी काम केले असेल, तर त्याचा सेवा कालावधी 4 वर्षे म्हणून गणला जाईल आणि अशा परिस्थितीत त्याला ग्रॅच्युइटी मिळणार नाही.