Highly Paid Jobs : वर्षाला 80 ते 90 लाखांच्या घरात पगार! पण कोणीही नोकरी करायला तयार नाही, असं का?

Highly Paid Jobs : इथे प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असते. गडगंज पगाराच्या नोकऱ्या जगाच्या पाठीवर असंख्य आहेत. वर्षाला 80 ते 90 लाखांच्या पगार असलेल्या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज पाठवा असंही या कंपन्यांकडून मागवण्यात आले आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या नोकरीसाठी कोणीही अर्ज करायला तयार नाहीत.   

Jun 05, 2024, 16:01 PM IST
1/8

जगाच्या काही उच्च पगाराच्या नोकऱ्या असूनही इथे लोक काम करायला येत नाही. यामागील कारणं जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोणत्या आहेत त्या नोकऱ्या जाणून घेऊयात. 

2/8

जगभरात आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष मागणी असते. जागतिक स्तरावर या नोकरीतील वार्षिक वेतन 40 लाख मिळतो. पण भारत सोडता इतर देशांमध्ये नोकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आणि सुरक्षा उपकरणे असतात. तिथल्या नियम आणि कायद्यांमुळे ही नोकरी करायला कोणी तयार होत नाहीत. 

3/8

कत्तलखान्यातील कामगाराचे कामासाठी कोणत्याही शैक्षणिक ज्ञानाची आवश्यकता नसते पण अनेकांना हे काम आवडत नाही. यामध्ये मांस कापून ते दुकाने आणि निर्यात कंपन्यांमधील पॅकेजिंग क्षेत्रात पाठवावं लागत. या नोकरीसाठी वार्षिक पगार हा 34 लाखांपर्यंत असतो. 

4/8

विकसित देशांमध्ये शौचालय साफ करण्यासाठी कामगार लागतात. यासाठी इथे एका तासासाठी 1200 रुपये मिळतात. 

5/8

खाण कामगार म्हणून काम करणे हे सर्वात घातक कामांपैकी एक असून हे करायलाही कोणालाही आवडत नाही. या कामासाठी वर्षाला 94 लाख रुपये मिळतात. 

6/8

सीवर इन्स्पेक्टरच्या नोकरीत, सांडपाणी पाईपची दुरुस्त करावी लागते. हे खूप आव्हानात्मक काम असून जगभरातील देशांमध्ये या नोकरीला चांगली मागणी आहे. या नोकरीसाठी वर्षाला अंदाजे 54 लाखापर्यंत पगार मिळतो. 

7/8

गुन्हेगारी स्थळाची साफ करणाऱ्यांनाही चांगला पगार मिळतो. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केल्यानंतर, काही लोकांना घटनास्थळाच्या साफसफाईचे काम देण्यात येतं. त्यांना जागतिक स्तरावर वर्षाला 60 लाख रुपये मिळतात.

8/8

बैलांच्या प्रजननासाठी स्पर्म गोळा करणाऱ्या व्यक्तीचा पगार 44,000 अमेरिकन डॉलर्सपासून सुरू होतो. भारतीय चलनानुसार 35 लाख पगार असतो. पण हे जोखमीचं काम कोण करणार?