सलमानचं लग्न आणि करिअरविषयी सलीम खान यांची भविष्यवाणी ठरली खरी!

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आजही बॅचरल आहे. सलमान आज 58 वर्षांचा असला तरी त्याच्या लग्नाची प्रेक्षकांना आतुरता आहे. सलमान कधी लग्न बंधनात अडकणार याची त्याचे चाहते प्रतिक्षा करत आहेत. पण सलमान लग्न करेल असं काही वाटतं नाही. सलमानच्या लग्नाविषयी त्याचे वडील सलीम खान यांनी एक भविष्यवाणी केली होती. त्याविषयी जाणून घेऊया.

Diksha Patil | May 22, 2024, 14:15 PM IST
1/7

सलमानचं लग्न आणि करिअरसंबंधीत भविष्यवाणी

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी काही वर्षांपूर्वी त्याच्या लग्नाविषयी आणि त्याच्या भविष्याविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. 

2/7

फ्लॉप करिअर

2009 च्या आधी सलमान खानचे अनेक चित्रपट हे फ्लॉप ठरत होते. तो त्याच्या आयुष्यातील कठीण काळातून जात होता. त्याविषयी सलीम खान यांनी भविष्यवाणी केली होती. 

3/7

आयुष्यात घडणार चांगल्या गोष्टी

सलीम खान म्हणाले होते की 2009 नंतर त्यांच्या मुलाचं आयुष्य बदलेलं आणि त्याच्या आयुष्यात खूप काही चांगलं होईल.   

4/7

सलमानचं लग्न

सलमानच्या लग्नाविषयी बोलत सलीम खान म्हणाले की एक किंवा दोन वर्षात सलमानचं लग्न होईल आणि जर असं झालं तर त्याचं लग्न होण्याची शक्यता खूप कमी आहे. 

5/7

भविष्यवाणी ठरली खरी

सलीम खान यांनी केलेली ही भविष्यवाणी सत्य ठरली आहे. त्याचं आजपर्यंत लग्न झालेलं नाही आणि 2009 नंतर त्याला करिअरमध्ये खूप यश मिळालं. 

6/7

सलमानचं आगामी प्रोजेक्ट

सलमान हा लवकरच 'सिकंदर' हा चित्रपट घेऊन येणार आहे. पुढच्या वर्षी ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

7/7

(All Photo Credit : Salman Khan Instagram / Social Media)