शाळेत असताना 100 किलो पेक्षा जास्त वजन! सलमान खानच्या 'या' अभिनेत्रीला व्हायचं होतं कार्डिअॅक सर्जन
बॉलिवूडच्या भाईजानसोबत अर्थात सलमान खानच्या चित्रपटातून आजवर अनेक अभिनेत्रींनी त्यांचं फिल्मी करिअर सुरु केलं आहे. त्यातही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी कधीच अभिनय क्षेत्रात येण्याचा विचारही केला नव्हता. त्यापैकी एका अभिनेत्रीविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
Diksha Patil
| Aug 01, 2024, 17:04 PM IST
1/7

2/7

ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून झरीन खान आहे. झरीन खाननं शो दरम्यान, स्कूल-कॉलेजच्या काळातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यावेळी तिनं लठ्ठत्व आणि तिच्या वेट लॉसच्या जर्नीविषयी सांगितलं आहे. झरीन खाननं सांगितलं की तिचं अभिनय क्षेत्रात येण्याचा कोणताही विचार नव्हता आणि तिला वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं.
3/7

शोबिज इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच्या तिच्या आयुष्याविषयी झरीन खाननं अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी तिनं सांगितलं की तिला एक कार्डिअॅक सर्जन व्हायचं होतं. त्याविषयी बोलताना झरीन खाननं सांगितलं की 'माझा प्रवास अचानक आणि सोपी होती. मी एक कार्डिअॅक सर्जन होण्यापासून एका वयानंतर लग्न करण्याचा देखील प्लॅन केला होता.'
4/7

5/7

6/7

झरीन खाननं पुढे सांगितलं की 'शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना तिचं वजन हे 100 किलो पेक्षा जास्त होतं आणि ती टॉमबॉय होती. माझी आई हार्ट पेशेंट असल्यानं मला कार्डिअॅक सर्जन व्हायचं होतं. तिची इच्छा होती की मी त्याचा अभ्यास करू आणि मग त्यानंतर तिची सर्जरी करू. हा माझ्या संपूर्ण कुटुंबाचा प्लॅन होता, जो अपयशी ठरला.'
7/7
