सरफरोश खरंच तेलगू सिनेमाचा रिमेक आहे का?

Sarfarosh 25th anniversary screening : सरफरोश हा चित्रपटाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त बॉलीवूड स्टार आमिर खान आणि सरफरोशची टीम मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करणार आहेत.

Saurabh Talekar | May 08, 2024, 20:22 PM IST

Sarfarosh Telugu remake Film Astram : आमिर खान आणि सोनाली बेंद्रे या कलाकारांचा हा सिनेमा 30 एप्रिल 1999 मध्ये रिलीज झाला होता.

1/7

मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे 10 मे रोजी स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त इतर बॉलिवूड स्टार देखील उपस्थित असतील.

2/7

संगीत दिग्दर्शक ललित पंडित, मुकेश ऋषी, नसीरुद्दीन शाह, मकरद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजेश जोशी, स्मिता जयकर, मनोज जोशी, उपासना सिंग, अखिलेंद्र मिश्रा आणि आकाश खुराना देखील उपस्थित राहणार आहेत.

3/7

मात्र, अनेकदा चर्चा होती ते सरफरोशच्या रिमेकची... सरफरोश सिनेमा तेलुगूच्या अस्त्रम या सिनेमाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला जातो.

4/7

अस्त्रम हा 2006 चा भारतीय तेलुगु भाषेतील ॲक्शन क्राईम चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केलं आहे.   

5/7

अस्त्रम या चित्रपटात विष्णू मंचू, अनुष्का शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि राहुल देव यांच्या भूमिका आहेत. 

6/7

खरं पहायला गेलं तर, अस्त्रम हा तेलुगू सिनेमा सरफरोश या हिंदी चित्रपटाचा हा रिमेक आहे.

7/7

सरफरोश सिनेमा रिलीज झाल्यावर चित्रपट समीक्षक आणि व्यावसायिक दोन्ही पद्धतीने यशस्वी झाला होता.