Shah Rukh Khan : किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' ठिकाणी होणार खास सन्मान!

Shah Rukh Khan to be honoured at Locarno Film Festival : करोडो भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान... अशातच सिनेविश्वातील योगदानासाठी शाहरुखचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Saurabh Talekar | Jul 02, 2024, 19:40 PM IST
1/6

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खानने सिनेसृष्टीत तुफान लोकप्रियता मिळवली. मागील 31 वर्षांपासून शाहरुख इंडस्ट्री गाजवतोय.

2/6

शिरपेचात मानाचा तुरा

कुच कुच होता है पासून आत्ताच्या डंकीपर्यंत शाहरुखने लोकांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अशातच आता किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.  

3/6

लोकार्नो फिल्म फेस्टिव्ह

शाहरुख खानचा 2024 सालच्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

4/6

ओपन-एअर व्हेन्यू पियाझा ग्रांडे

उल्लेखनीय योगदानासाठी ओपन-एअर व्हेन्यू पियाझा ग्रांडे येथे 10 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाईल, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

5/6

नम्र कलाकार

अतिशय आधुनिक आणि नम्र कलाकार असलेला शाहरुख खान आपल्या काळातील एक दंतकथा आहे, असं आर्टिस्टिक डायरेक्टर जिओना ए. नाझारो यांनी म्हटलं आहे.

6/6

धाडसी कलाकार

भारतीय चित्रपटसृष्टीतील शाहरुख खानचं योगदान अभूतपूर्व आहे आणि किंग खान एक धाडसी कलाकार आहेत, असं म्हणत जिओना ए. नाझारो यांनी शाहरूखचं कौतूक देखील केलंय.