PHOTO : Sharmila Tagore यांच्या वाढदिवसानिमित्तानं 3 पिढ्या आल्या एकत्र

दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी काल त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी मिळून हा वाढदिवस खास केला आहे. हे फोटो त्यांची लेक सोहा अली खान आणि नात सारा अली खाननं शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पतौडी कुटुंब दिसत आहे. 

| Dec 09, 2024, 12:42 PM IST
1/7

शर्मिला यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पतौडी कुटुंब हे एकत्र आलं आणि फोटोंमध्ये दाखवण्यात आलं की ते सगळे एकत्र खूप चांगला वेळ व्यथित करत आहे. 

2/7

सारा अली खाननं शर्मिला टागोर यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यासोबत हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की 'हॅप्पी बर्थडे दादी जान हमारे परिवार की आन और शान।' असं कॅप्शन दिलं आहे.   

3/7

संपूर्ण कुटुंबानं एकत्र लंच केलं. यात तैमूर अली खान, जेह, इनाया, सैफ अली खान, सोहा अली खान, सबा पटौदी, कुणाल खेमू आणि करीना दिसले आहेत. 

4/7

एक फोटो आणि व्हिडीओ आहे त्यात शर्मिला या केक कापताना दिसत आहेत. यावेळी शर्मिला टागोर यांनी नारंगी रंगाचा ओढणीसोबत आयव्हरी ड्रेस परिधान केला आहे. 

5/7

सोहा अली खाननं शर्मिला टागोर यांच्या बर्थे पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सोहानं लिहिलं की भरलेलं पोट आणि भरलेलं हृदयही. तर यासोबत सोहानं एक फोटो शेअर केलाय त्यात इनाया आणि जेह शर्मिला यांच्यासोबत पोज देत आहेत. तर इनायानं त्यांच्यासाठी स्पेशल कार्ड बनवलं आहे. 

6/7

तर करीना कपूनं शर्मिला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली की 'आतापर्यंतचा सगळ्या चांगला गॅंगस्टर कोण आहे? आता मला सांगण्याची गरज आहे? माझी सगळ्यात चांगली सासू वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

7/7

सारा अली खाननं यावेळी वडील सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे.