PHOTO : वडील जर्मन आणि आई बंगाली, अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव; पहिलं लग्न 5 वर्षात तुटलं, दुसऱ्या लग्नापूर्वी ती प्रेग्नेंट

Entertainment : बॉलिवूडमधील या सुंदर अभिनेत्रीचा 9 डिसेंबर वाढदिवस आहे. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. वयाचा 43 व्या वर्षीही तिची सुंदरता आणि गोड स्मित हास्य चाहत्यांना वेड लावतं. 

| Dec 09, 2024, 00:31 AM IST
1/10

2000 साली मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा मुकुट जिंकणाऱ्या या अभिनेत्री खरं तर कोणताही ओळखीची गरज नाही. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांची तिने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. 

2/10

9 डिसेंबर 1981 मध्ये हैदराबाद, तेलंगणामध्ये जन्माला आलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे दिया मिर्झा. 2001 मध्ये 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून तिचा बॉलिवूडचा प्रवास सुरु झाला. पण तिचा प्रोफेशनल लाइफसोबत तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. 

3/10

दिया मिर्झाचं बालपण फारसे चांगले गेलं नाही. कौटुंबिक अडचणींमुळे तिने वयाच्या 16 व्या वर्षी मल्टीमीडिया कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे का या अभिनेत्रीचं खरं नाव दिया हँडरिच आहे. नंतर तिने आपलं आडनाव बदलून 'मिर्झा' केलं. 

4/10

मुस्लिम आडनाव वापरण्यामागे एक खास कारण होतं. दियाचे वडील फ्रँक हँडरिक हे जर्मन इंटिरियर डिझायनर होते. तिची आई दीपा मिर्झा बंगाली आहे. दिया 6 वर्षांची असताना तिचे आई-वडील वेगळे झाले आणि ती 9 वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं.

5/10

दियाच्या आईने अजीज मिर्झा नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. दीया तिच्या सावत्र वडिलांच्या खूप जवळ होती. तिच्या नजरेत तो एक चांगला पिता होता. तिच्या सावत्र वडिलांचा आदर म्हणून तिने मिर्झा आडनाव लावायला सुरु केली. पण अहमद मिर्झा यांचं 2004 मध्ये निधन झालं.

6/10

दियाची लव्ह लाईफही चर्चेत राहिली आहे. दिया मिर्झाचा विवाह साहिल सिंघासोबत 18 ऑक्टोबर 2014 रोजी दिल्लीत झाला होता. दोघांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. साहिल दियाला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी गेला होता.

7/10

जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर एके दिवशी साहिलने दियाला प्रपोज केले. दिया मिर्झा आणि साहिल सिंघा यांचा 5 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर घटस्फोट झाला आणि दोघांनीही आपले नाते संपवले. 

8/10

2020 मध्ये दियाने बिझनेसमन वैभव रेखी यांची भेट घेतली. त्यावेळी भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान दिया वैभवसोबत तिच्या पाली हिलच्या घरी राहत होती.

9/10

दोघेही जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट करत होतं आणि त्यांनी त्यांचं नाते अगदी गुपित ठेवलं होतं. 1 वर्ष एकमेकांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवल्यानंतर आणि एकमेकांना समजून घेतल्यानंतर, दिया आणि वैभवने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 15 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांचं लग्न झालं.

10/10

14 जुलै 2021 रोजी, जोडप्याने घोषित केलं की त्यांनी 14 मे रोजी एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव त्यांनी अवयान आझाद रेखी ठेवले. अभिनेत्री लग्नापूर्वी प्रेग्नेट होती. आम्ही तुम्हाला सांगतो, वैभव रेखीला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे तिचं नाव समायरा रेखी आहे.