‘ज्यूसमध्ये काही टाकलंय का? काही नाही तू पी!’, 'तो' एक Video ज्यामुळे तरुणीला कोर्टाने फाशीच दिली!

Sharon Raj Murder Case: शॅरॉनला लैंगिक संबंधाच्या नावाखाली बोलावणं आणि गुन्हा करणं याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.   

Shivraj Yadav | Jan 20, 2025, 19:37 PM IST

Sharon Raj Murder Case: शॅरॉनला लैंगिक संबंधाच्या नावाखाली बोलावणं आणि गुन्हा करणं याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. 

 

1/11

Sharon Raj Murder Case: केरळमधील जिल्हा न्यायालयाने 24 वर्षीय ग्रिष्मा या तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.  तरुणीने दोन वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली होती. 2022 मध्ये तिने प्रियकर शॅरॉनला विष पाजलं होतं.   

2/11

शॅरॉनला लैंगिक संबंधाच्या नावाखाली बोलावणं आणि गुन्हा करणं याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.   

3/11

सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितलं की, "अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होईल याची खात्री करणं ही राज्याची जबाबदारी आहे. शॅरॉनने ज्युसमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचं सांगत व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यावेळी ग्रिष्मा त्याला व्हिडीओ रेकॉर्ड करु नको सांगत होती, यावरुन त्याला शंका आल्याचं स्पष्ट होत आहे. शॅरॉनने पाण्याच एक थेंबही न पिता 11 दिवस मृत्यूशी संघर्ष दिला".  

4/11

2022 मध्ये ग्रीष्माने प्रियकराला पॅराक्वॅट या तणनाशकाने बनलेले आयुर्वेदिक टॉनिक देऊन विषप्रयोग केला होता. 11 दिवसांनी सर्व अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल होता. तामिळनाडूमधील एका लष्कर जवानाशी लग्न ठरल्यानंतरही राज नातं संपवण्यास तयार नसल्याने ग्रीष्माने हत्येचा कट आखला होता.   

5/11

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीष्माने याआधी पळांच्या ज्यूसमध्ये पॅरासिटोमॉल टॅब्लेट मिसळून राजची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण चव खराब असल्याचं सांगत त्याने पिण्यास नकार दिला होता.   

6/11

गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या स्थानिक न्यायालयाने गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचे वय विचारात घेण्याची गरज नाही असं निरीक्षण नोंदवलं. आरोपीने तिच्या शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणे आणि ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे हे कारण देत शिक्षेत सौम्यता मागितली होती.  

7/11

गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य, डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. केरळमध्ये फाशीची शिक्षा भोगणारी ग्रीष्मा ही सर्वात तरुण महिला ठरली आहे. पीडितेच्या वकिलाने निकालानंतर न्यायालय पुरावे स्वीकारेल असा विश्वास व्यक्त केला आहे.   

8/11

"मी कोर्टासमोर युक्तिवाद करत असताना, कोर्ट आम्ही दिलेले पुरावे स्विकारेल असा विश्वास होता. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचा युक्तिवाद मी केला. तसंच याप्रकरणी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. हा आदर्श निर्णय आहे," असं विशेष सरकारी वकील व्ही एस विनीत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.  

9/11

ग्रिष्मा तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील एका खासगी कॉलेजमध्ये साहित्य शिकत होती. तर शॅरॉन हा बीएससी रेडिओलॉजीच्या शेवटच्या वर्षाला होता. दोघं एकाच कॉलेजमध्ये होते. तसंच जवळपास दीड वर्षं नात्यात होते.   

10/11

ग्रीष्माला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये खून देखील समाविष्ट आहे. तिचे काका निर्मलाकुमारन नायर यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आरोपीच्या आईलाही ताब्यात घेण्यात आले होते, परंतु पुराव्याअभावी तिला निर्दोष सोडण्यात आलं.  

11/11

न्यायालयाने असंही नमूद केलं की दोषीने शेरॉनकडून शारीरिक शोषण केल्याच्या दाव्याचा पुरावा नाही. "उलटपक्षी, शेरॉनने कधीही कोणत्याही संदेशात तिला दोषी ठरवले नव्हतं. शेरॉनशी संबंधात असतानाही ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या संपर्कात होती," असं न्यायालयाने म्हटलं आहे,