Shehzada box office collection Day 3: बॉक्स ऑफिसवर Kartik Aaryan ची जादू फिकी, पाहा तिसऱ्या दिवसाची कमाई

Shehzada box office collection: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि क्रिती सेनॉनच्या (Kriti Senon) शेहजादाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी चांगला कलेक्शन नोंदवला. 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली.

Feb 20, 2023, 12:32 PM IST

Kartik Aaryan, Shehzada: मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये कोणाचं नाणं खणखणीत वाजत असेल तर ते किंग शाहरूख खान (Shahrukh khan) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचं. मागच्या वर्षी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट पडले मात्र कार्तिक आर्यनने बॉक्स ऑफिसवर (box office) दमदार कमाई केली होती.  अशातच आता गेल्या काही दिवसांपासून कार्तिकचा 'शहजादा' हा चित्रपट (Shehzada Movie) चर्चेत आहे. 

1/5

'शहजादा' या चित्रपटाचा ट्रेलर (Shehzada Trailer) पाहताच चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. 17 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

2/5

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि क्रिती सेनॉनच्या (Kriti Senon) शेहजादाने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी चांगला कलेक्शन नोंदवला. 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी वाढ झाली.

3/5

पहिल्या दिवशी, शहजादाने (Shehzada box office collection) चित्रपटगृहांमध्ये बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची कमाई केली. त्यानंतर चित्रपट आपटेल, अशी शक्यता होती. मात्र विकेंडला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

4/5

रविवारी, 19 फेब्रुवारीला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी वाढ झाली. सुरुवातीच्या अंदाजानुसार या चित्रपटाने भारतात 7.30 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींचा गल्ला पार केला असण्याची शक्यता आहे.

5/5

शेजादा हा तेलगू सुपरहिट चित्रपट, अला वैकुंठापुरमलूचा (Ala Vaikunthapurramuloo) अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यात अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांनी अभिनय केलाय.