शंभरातला एकही वाचला नाही, पाचपैकी एकालाही धक्का लागला नाही;10 कृष्णनिती प्रत्येकाला माहिती असयला हव्या!

भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया. 

| Aug 27, 2024, 09:57 AM IST

Shri Krishna Janmashtami 2024: भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया. 

1/11

शंभरातला एकही वाचला नाही, पाचपैकी एकालाही धक्का लागला नाही;10 कृष्णनिती प्रत्येकाला माहिती असयला हव्या!

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News

Shri Krishna Janmashtami 2024: भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया. 

2/11

कोण कुठे आहे, हे स्पष्ट व्हायला हवे

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

धर्म आणि अधर्माचा प्रश्न येतो तेव्हा कोण कुठे आहे? हे कळायला हवे. युद्ध सुरु करण्याआधी कोण मित्र आहे? कोण शत्रू आहे? या समजायला हवे.  त्यामुळे युद्धावेळी कोणता गैरसमज राहत नाही. 

3/11

युद्धाच्या जोशात ज्ञान गरजेचे

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

युद्धाच्या प्रसंगी ज्ञान, सत्संग आणि प्रवचन ऐकत राहणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्तीचे आपल्या ध्येयावर लक्ष राहते. 

4/11

भीतीला जिंकणे आवश्यक

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

संकटावेळी यश मिळत नसेल तर धैर्य हरु नये. अपयशाची कारणे जाणून घेऊन पुढे जायला हवे. समस्यांचा सामना करायला हवा. एकदा भीतीवर विजय मिळवला की विजय तुमचाच असतो.

5/11

कूटनितीचा मार्ग कधी निवडायचा

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

धर्माचे रक्षण करताना तुमचा विरोधक खूप ताकदवान असेल तर कूटनिती वापरुन लढायला हवे, ही शिकवण भगवान श्रीकृष्णांनी दिली. त्यांनी कालयवन आणि जरासंध यांच्यासोबत असेच केले. आजही या मार्गाच अवलंब केला जातो. 

6/11

साहस, रणनिती आणि योग्यवेळी ताकदीचा वापर

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

युद्ध प्रसंगात साहस, रणनिती आणि योग्य वेळेवर हत्यार आणि योग्य व्यक्तीचा उपयोग महत्वपूर्ण असतो. पांडवांची संख्या कमी झाली होती तरी ते शक्तीशाली होते. कृष्णनितीमुळे त्यांचा विजय झाला. अर्जुनासोबत इतर पांडवांनी आपल्या सोबत लढणाऱ्यांची मदत केली. 

7/11

संधीचं योग्यवेळी सोनं करणं

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

भगवान श्रीकृष्णाचा दूरदर्शीपणा, रणनिती आणि नितीमुळे महाभारतात 5 पांडव 100 कौरवांवर भारी पडले. युद्धात तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळाली तर सोडू नका. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांवर अंतिम संस्कार, जखमींवर उपचार, लाखो सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था, सर्व सैनिकांना वेळोवेळी हत्याराची व्यवस्था याची काळजी भगवान कृष्णांनी घेतली.

8/11

प्रत्येक सैनिकाला राजा समजा

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

सेनापती असो की सैनिक, प्रत्येकाला राजा समजायला हवे. तुम्हाला त्यांच्या भरवश्यावरच विजय मिळणार आहे. प्रत्येक सैनिकाचे आयुष्य अमूल्य आहे.सैनिकाला संकटात पाहून पांडव त्यांच्या मदतीला धावायचे.

9/11

अधर्माल्या मारताना विचार करु नका

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

धर्माच्या विरोधात असणाऱ्याला मारताना विचार करु नका. विरोधकाला तुमच्यावर वरचढ होण्याची संधी देऊ नका. कोणत्याही स्थितीत दुश्मनाला निसटण्याची संधी देऊ नये. कृष्णाने द्रोण आणि कर्णासोबत हेच केले.

10/11

प्रत्येक योजना सुनियोजित

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

जेव्हा देश, धर्म, सत्याचा प्रश्न असतो तेव्हा कोणते वचन, करार कायमस्वरुपी नसतो. वेळप्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी हत्यार न उचलण्याची आपली प्रतिज्ञा तोडली आणि धर्माचे रक्षण केले. 

11/11

विश्वरुप आणि भगवद् गीता

Shri Krishna 10 Mahabharat niti learning from lord krishna Marathi News|Zee 24 Taas

महाभारताच्या भयानक युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. कोणी व्यक्ती आयुष्यात संघर्ष करत असेल तेव्हा त्याने ज्ञान, सत्संग आणि प्रवचन ऐकणे आवश्यक असतात. प्रेरणा मिळण्यासाठी हे आवश्यक असते.