खट्याळ आणि प्रमेळ भावंडांना Siblings Day च्या खास शुभेच्छा
तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून करमेना असं हे भावंडांच नातं खास असतं. एकामागोमाग आलेली ही भावंडं एकमेकांचा घट्ट आधार बनतात. आज 10 एप्रिल रोजी 'सिब्लिंग्स डे' साजरा केला जातो.
भारतामध्ये 10 एप्रिल हा दिवस 'सिब्लिंग्स डे' म्हणून साजरा केला जातो. एरवी कितीही भांडण झालं तरीही एकमेकांशिवाय न राहणाऱ्या भावंडांचं नातं अतिशय खास असतं. अनेकदा आपल्याला आपल्या बहिण किंवा भावाबद्दल अनेक गोष्टी वाटतं असतात पण त्या कधी सांगितल्या जात नाहीत. तर या दिवसाच औचित्य साधून करा मनातील भावना व्यक्त आणि यासाठी या खास शुभेच्छांची मदत घ्या.
