25 व्या वर्षी 2 हजाराने सुरु करा SIP, 60 व्या वर्षी व्हाल 2 कोटींचे मालक; 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल!

एका सुत्राचे तुम्हाला पालन करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळात करोडो रुपयांचा निधी जमा करून शांततेत आयुष्य जगू शकता.

| Apr 07, 2024, 14:20 PM IST

Sip Superhit Plan : एका सुत्राचे तुम्हाला पालन करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळात करोडो रुपयांचा निधी जमा करून शांततेत आयुष्य जगू शकता.

1/8

25 व्या वर्षी 2 हजाराने सुरु करा SIP, 60 व्या वर्षी व्हाल 2 कोटींचे मालक; 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल!

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

आजच्या काळात गुंतवणुकीचे महत्व खूप आहे. पहिल्या नोकरीपासूनच अनेकजण आपल्या निवृत्तीचे नियोजन करू लागतात. गुंतवणूक छोटी असो की मोठी याने काही फरक पडत नाही. पण तुम्ही त्यात सातत्य ठेवलात तर दिर्घकालीन परिणाम तुम्हाला दिसतील.

2/8

एका सुत्राचे पालन

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. छोटीशी गुंतवणूक तुम्ही वेळोवेळी वाढवत गेलात तर काही वर्षांत तुमच्याकडे इतकी रक्कम असेल की तुम्ही विचारही नाही करु शकत. यासाठी एका सुत्राचे तुम्हाला पालन करावे लागेल. ज्यामुळे तुम्ही वृद्धापकाळात करोडो रुपयांचा निधी जमा करून शांततेत आयुष्य जगू शकता.

3/8

25/2/5/35 चे सूत्र

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

हे सूत्र 25/2/5/35 आहे. यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक धोरण अवलंबावे लागेल.म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करुन तुम्ही हे ध्येय साध्य करु शकता. या सूत्रानुसार, तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करावी लागेल. 2 म्हणजे किमान रु. 2000 च्या SIP सह गुंतवणूक सुरू करावी लागेल. पुढचे 5 म्हणजे दरवर्षी 5 टक्के रक्कम वाढवावी लागेल आणि 35 म्हणजे ही SIP सतत 35 वर्षे सुरू ठेवावी लागेल.

4/8

फक्त 100 रुपये वाढवा

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

उदाहरणाने समजून घेऊया. समजा सचिन नावाच्या 25 वर्षाच्या तरुणाने 2000 रुपयांची एसआयपी सुरू केली. यात दरवर्षी त्याने 5 टक्के रक्कम वाढवली. पुढच्या वर्षी सचिनला 2000 रुपयांच्या 5 टक्के म्हणजेच फक्त 100 रुपये वाढवावे लागतील. 

5/8

एका वर्षासाठी 2100 रुपये

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

अशा प्रकारे सचिनला एका वर्षासाठी 2100 रुपयांची SIP चालवावी लागेल. पुढील वर्षी 2 हजार 100 ची रक्कम 5% ने वाढवावी लागेल. म्हणजे रु. 105 आणि संपूर्ण वर्षासाठी 2 हजार 205 चा SIP करावी लागेल.

6/8

रकमेच्या 5 टक्के वाढ

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

त्याचप्रमाणे, दरवर्षी तुम्हाला सध्याच्या रकमेच्या 5 टक्के वाढ करावी लागेल. सचिनची ही गुंतवणूक 35 वर्षे सुरू राहणार आहे.सचिन जेव्हा 60 वर्षांचा होईल तेव्हा त्याच्याकडे या गुंतवणुकीद्वारे एक चांगला सेवानिवृत्ती निधी गोळा झालेले असतील.

7/8

आता 2 कोटी कसे जोडले जातील ते पहा

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

सचिनने 35 वर्षे गुंतवणूक सुरु ठेवली तर SIP कॅल्क्युलेटरनुसार तो एकूण 2 लाख16 हजार 768 रुपयांची गुंतवणूक करेल. SIP वर सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. त्यामुळे सचिनला त्याच्या गुंतवणुकीवर 1 कोटी 77 लाख 7 1 हजार 532 रुपये व्याज मिळेल. 

8/8

2 कोटी रुपयांचे मालक

Sip Superhit Plan systematic investment For Retirnemnt

अशाप्रकारे गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र करून 1 कोटी 99 लाख 39 हजार 220 म्हणजेच 2 कोटींच्या जवळ जाणारी रक्कम मिळेल. अशा प्रकारे आता वयाच्या पंचविशीत असलेला सचिन वयाच्या 60 व्या वर्षी 2 कोटी रुपयांचे मालक झालेला असेल.