शालेय जीवनापासूनचं प्रेम आणि आता लग्न... कोट्यधीश व्यावसायिकासह किर्ती सुरेशचं शुभमंगल; भर मंडपात अभिनेत्री भावूक

साऊथ चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश लग्नबंधनात अडकली आहे. बिझनेसमन अँटोनी थाटीलला डेट करत असल्याचे तिने जाहीर केलं होतं. किर्ती सुरेश आणि अँटोनी गेल्या 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु अभिनेत्रीने आता लग्नबंधनात अडकून फोटो शेअर केले आहेत. 

| Dec 13, 2024, 09:55 AM IST

साऊथ चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश लग्नबंधनात अडकली आहे. बिझनेसमन अँटोनी थाटीलला डेट करत असल्याचे तिने जाहीर केलं होतं. किर्ती सुरेश आणि अँटोनी गेल्या 15 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु अभिनेत्रीने आता लग्नबंधनात अडकून फोटो शेअर केले आहेत. 

1/8

अभिनेत्री किर्ती सुरेशचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला आहे. 15 वर्षांच्या या नात्याला नाव मिळालं आहे. व्यवसायिकाशी लग्नबंधनात अडकला.

2/8

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिचा 15 वर्षांपासून असलेला प्रियकर अँटोनी थट्टिलसोबत लग्नगाठ बांधणार आहे.   

3/8

किर्ती आणि अँटनी 11 आणि 12 डिसेंबर रोजी गोव्यात सात फेरे घेतले. दोघेही 15 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. किर्तीचा भावी नवरा कोण हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

4/8

कीर्ती सुरेशचा भावी पती अँटोनी थट्टिल हा एस्पेरोस विंडो सोल्युशन्सचा मालक आहे. तो दुबईस्थित व्यापारी असून त्याचे मूळ गाव कोची आहे. अँटोनी थाटील हे दोन कंपन्यांचे मालक आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याला खूप लो प्रोफाइल ठेवायला आवडते.  

5/8

कीर्ती सुरेश आणि अँटोनी थट्टिल यांची प्रेमकहाणी खूपच गोड आहे. अभिनेत्री हायस्कूलमध्ये आणि अँटोनी कॉलेजमध्ये असताना कीर्ती आणि अँटोनीचे नाते सुरू झाले.   

6/8

दोघेही 15 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि आता ते त्यांच्या नात्याला नवे नाव आणि स्टेटस देणार आहेत.  या दोघांनी अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले.  

7/8

32 वर्षीय किर्ती सुरेशने तमिळ तसेच तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'महानती' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटात तिने ज्येष्ठ अभिनेत्री सावित्रीची भूमिका साकारली होती. 

8/8

लवकरच अभिनेत्री बेबी जॉन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत वरुण धवन आहे आणि हा चित्रपट ख्रिसमस, डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.