एलॉन मस्क इतका श्रीमंत झाला तरी कसा? खरंच या 5 Idea ठरल्या गेम चेंजर?

Elon Musk Success : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांच्या यशाची वाटचाल कशी होती माहितीये? 

Jan 22, 2025, 14:20 PM IST

Elon Musk : एक सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थी ते टेय टायटन... जगातील श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी पुरेसा होता मस्कचा आत्मविश्वास आणि त्याच्या 5 Ideas... 

1/8

एलॉन मस्क

Success business news World Richest Man Elon musk thoughts

Elon Musk Success : एलॉन मस्क, या व्यक्तीची वेगळी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही. जगातील सर्वाधिक श्रीमंती असणाऱ्यांच्या यादीत सातत्यानं सरशी मिळवणारा मस्क कैक मोठ्या कंपन्यांचा मालक आहे. 

2/8

इलेक्ट्रीक कार

Success business news World Richest Man Elon musk thoughts

इलेक्ट्रीक कार म्हणू नका, अंतराळयान, अंतराळ प्रवास म्हणू नका किंवा मग अगदी सोशल मीडिया म्हणू नका. असं एकही क्षेत्र नाही जिथं मस्कनं आपली छाप सोडली नाही. 

3/8

स्वप्न

Success business news World Richest Man Elon musk thoughts

मस्कनं आपण आयुष्यात काहीतरी भन्नाट करायचं हे स्वप्न अगदी महाविद्यालयीन दिवसांपासूनच पाहिलं होतं असं म्हटलं जातं. 2016 मध्येच त्यानं सांगितलेलं की, पाच कल्पना त्यानं कधीच सत्यात उतरवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते.   

4/8

अंतराळ

Success business news World Richest Man Elon musk thoughts

पृथ्वीशिवायही इतर ग्रहांवर मानवी वस्ची असावी आणि त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत असं मस्कला कायमच वाटत असे. यासाठी त्यानं स्पेसएक्स नावाची कंपनी सुरू केली.   

5/8

पर्यावरण

Success business news World Richest Man Elon musk thoughts

पृथ्वीला वाचवण्यासाठी मानवाकडूनची काही केलं जाणं अपेक्षित आहे याच भावनेतून पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी म्हणून मस्कनं टेस्ला नावाची इलेक्ट्रीक कार तयार करणारी कंपनी सुरू केली.   

6/8

इंटरनेट

Success business news World Richest Man Elon musk thoughts

इंटरनेटची ताकद मस्कनं केव्हाचीच हेरली होती. या माध्यमातून क्रांती घडू शकते या विचारानं जिप2 आणि पेपाल या कंपन्या त्यानं सुरू केल्या. ज्यामुळं इंटरनेटवर काम करणं आणखी सोपं ठरलं.   

7/8

आजारपण

Success business news World Richest Man Elon musk thoughts

आजारपणं कमी करण्यासाठी म्हणून मस्कनं न्यूरालिंक नावाची न्यूरोटेक्नोलॉजी कंपनी सुरू केली. मानवी मेंदूला संगणकाशी जोडण्यासाठी म्हणून ही कंपनी प्रयत्न करत आहे.   

8/8

एआय

Success business news World Richest Man Elon musk thoughts

एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठीसुद्धा मस्क कायमच आग्रही राहिल्याचं पाहायला मिळालं. याचसाठी म्हणून त्यानं ओपन एआय ही कंपनीसुद्धा सुरू केली.