जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच आला समोर; पांढरा शर्ट, काळा चष्मा अन् हात, मानेवर...

Saif Ali Khan Discharged : 16 जानेवारी मध्यरात्री सैफ अली खानवर जीवघेणा हल्ल्या झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तो लीलावती हॉस्पिटलला पोहोचला होता. मेजर ऑपरेशननंतर 5 दिवसांनी छोटे नवाबला सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. 

नेहा चौधरी | Jan 21, 2025, 18:33 PM IST
1/7

16 जानेवारीची रात्र ही सैफ अली खान आणि त्याचा कुटुंबासाठी अतिशय धक्कादायक होती. मध्यरात्री 2 वाजता सैफच्या घरी चोरट्याने प्रवेश केला. त्यानंतर सैफ अली खानसोबत झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला. 

2/7

रक्ताने माखलेला, रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान ऑटो रिक्षातून लीलावती रुग्णालयात पोहोचला. तिथे गेल्यावर 'मी सैफ अली खान आहे, स्टेचर आणा' असं तो म्हणाला. 

3/7

त्याचावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला सिंहाची उपमा दिली. जखमी अवस्थेतही तो एका सिंहासारखा चालत हॉस्पिटलमध्ये आला. तो खरा हिरो आहे, असं लीलावतीमधील डॉक्टर म्हणाले. 

4/7

6 तासांच्या ऑपरेशननंतरही शुद्धीत आलेल्या सैफने डॉक्टरांना दोन प्रश्न विचारले. मी शूटिंगला जाऊ शकतो का? आणि जीमला करु शकता का? यावरुन त्याचा कामाप्रती श्रद्धा आणि फिटनेसचं रहस्य समजलंय. 

5/7

54 वर्षीय नवाबला आज हल्ल्यानंतर 5 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांसोबत सगळेच चिंतेत होते. पण आज नवाब ज्या शानमध्ये बाहेर आले ते पाहून जणू काही झालंच नव्हतं असं वाटतं होतं. 

6/7

पांढरा शर्ट, निळा डेनिम आणि काळा चष्मा अन् सोबत करीना, सारा...तो बाहेर आला अन् त्याने पापाराझींना थम्ब्स करुन आपण ठिक असल्याचा इशारा केला. त्यानंतर काळ्या रंगाच्या पोर्श कारने तो घराकडे रवाना झाला. यावेळीही मुंबई पोलीस अधिकारी त्याचा सोबत असल्याच पाहिला मिळाले. पाहा घरी पोहोचल्यावर सैफ अली खानचा व्हिडीओ 

7/7

सैफ अली खान नवीन घरी जिथे त्याच्यावर हल्ला त्या घरी जाणार की, जुन्या घरी अशी चर्चा रंगली होती. पण लीलावतीमधून सुट्टी मिळाल्यानंतर सैफ अली खान नवीन घरी गेला.