Summer Health Tips : उन्हाळ्यात त्वचा खराब होते? घरच्या घरी करा 'हे' उपाय

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात तुमच्या स्किनला तजेलदार आणि सुदंर ठेवण्यासाठी वापरा हजारोंचे प्रोडक्ट्स? तर जाणून घ्या घरच्या घरी कोणत्या गोष्टी करून शकता ज्यानं होईल तुमची स्किन ग्लोइंग आणि सूर्य किरणांपासून होईल सुरक्षा. चला जाणून घेऊया टिप्स आणि त्याचे उपाय.  

Mar 17, 2023, 17:17 PM IST

Summer Skin Care Tips : उन्हाळा म्हटलं की त्याच्यासोबत आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात धुळ आणि सततच्या गरम वाफांमुळे स्कीन ड्राय होते. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला जपण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. त्वचेचा ग्लो टिकवून ठेवण्यासाठी आपण महागडे-महागडे प्रोडक्ट्स वापरतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर खूप लक्ष द्यावे लागते. त्वचा चांगली आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी आज आपण स्किन केअर टिप्स जाणून घेणार आहोत. 

1/7

Summer Skin Care Tips

ऑइल फ्री फेसवॉश - उन्हाळ्यात आपली त्वचा खूप ऑइली होती. त्यामुळेच ऑइल फ्री फेसवॉश वापरण्यावर भर द्या. त्यामुळे फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावरील धूळ आणि ऑइलही निघून जातं. त्यामुळे पिंपल्स देखील येत नाहीत.   

2/7

Summer Skin Care Tips

त्वचेला मॉयश्चराइज करा - त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी तिला मॉयश्चराइज करा. उन्हाळ्यात त्वचेला मॉयश्चराइज करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग राहिल. त्यासाठी व्हिटामीन सी, अॅंटी ऑक्सीडंट मॉयश्चरायजरचा वापर कराल. रोज अंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉयश्चराइज करा.   

3/7

Summer Skin Care Tips

त्वचा ठेवा हायड्रेट - उन्हाळ्यात त्वचा ही ड्राय होते त्यामुळे त्याला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. त्यात पण थोडं पाणी नाही तर भरपुर पाणी प्यायला हवं. जर आपण पाणी प्यायलो नाही तर बॉडी डिहायड्रेट होते. तर चेहऱ्याला लावायला सुद्धा तुम्ही एका हायग्रेट ठेवेल अशा फेस मास्कचा वापर करू शकता. पण असं करून पाणी कमी प्यायलात तर चालेल असं नाही. तुम्ही पाणीही खूप प्यायला हवं.   

4/7

Summer Skin Care Tips

फळांचे सेवन - प्रत्येक सीजनला त्या काळात येणारी फळं खा. उन्हाळ्यात त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी आहारत सॅलेड आणि फळांचा समावेश करा.   

5/7

Summer Skin Care Tips

डेड स्किन सेल्स काढा - त्वचेला एक्सफोलिएट करनं गरजेचं आहे. त्वचा एक्सफोलिएट केल्यानं चेहऱ्यावर असलेली धूळ आणि ऑइल निघून जाते. त्यासोबत डेड स्किन सुद्धा निघते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर आणि कॉफीचं स्क्रबर वापरू शकता. त्यानं चेहऱ्यावर हलक्या हातानं 5 मिनिटं मालिश करा आणि मग चेहरा धुवून काढा.   

6/7

Summer Skin Care Tips

पीएच लेव्हल करा बॅलेन्स - त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी त्याचं पीएच लेव्हल बॅलेन्स ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या टोनरचा वापर करा. याशिवाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोनर, गुलाब जलचा टोनर म्हणून देखील वापर करू शकता.   

7/7

Summer Health Tips

सूर्य किरणांपासून स्वत: चे संरक्षण करा- सूर्य किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. सूर्याच्या किरणांमुळे आपण वयाच्या आधी म्हातारे दिसू शकतो. त्यासोबत रिंकल्स आणि फाइल लाइंसची समस्या देखील होते. सूर्याच्या किरणांपासून वाचून राहण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा. 30-40 एसपीएफ प्लस सनस्क्रीन वापरा. त्यानं तुम्ही टॅन होणार नाहीत तर त्यासोबतच तुमची सूर्य किरणांपासून सुरक्षा होईल.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)