सुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? लेकीनं दिली पावलोपावली साथ

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. मग चर्चा सुरु झाली पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. वडील शरद पवार यांचं लेक सुप्रियाला झुकतं माप मिळले का?

May 03, 2023, 12:40 PM IST

Supriya Sule : मंगळवारी  'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकारणातील चाणक्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली. (Supriya Sule or Ajit Pawr Who Will be Next NCP Chief Know Supriya Sule Political Journey Relation with Sharad Pawar and more)

1/14

शरद पवार निवृत्त होणार मग पक्षाची धुरा कोण सांभाळणार असे प्रश्न विचारले जात आहे. राजकीय सूत्रांनुसार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. 

2/14

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड सुरु असताना 15 दिवसांपूर्वी सु्प्रिया सुळे यांनी दोन राजकीय स्फोट होण्याचे संकेत दिले होते. पहिला स्फोट जर शरद पवार यांची घोषणा असेल तर दुसरी पक्षाच्या अध्यक्षपदी सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? 

3/14

पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहिलं जातं आहे. अशात सु्प्रियाताईंचा राजकीय प्रवास आणि सर्वसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता पाहता त्या नेतृत्त्व करतील अशी मोठ्या प्रमाणात शक्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 

4/14

राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पवारांचा हाच वारसा सुप्रिया सुळे कायम पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. शरद पवार यांनी राजकारणाची सुरुवात विधानसभेतून केली पण लेक सु्प्रियाने थेट संसदेतून राजकारणात एन्ट्री केली. संसदेत महाराष्ट्राचे अनेक मुद्द त्यांना लावून धरले. 

5/14

सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालायतून सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) या विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर सुप्रिया पवार यांचं लग्न सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी झाला.  लग्नानंतर त्या कॅलिफॉर्नियात राहण्यासाठी गेल्या. तिथे असताना त्यांनी जल प्रदूषण या विषयावर अभ्यास केला.

6/14

त्या काळात शरद पवारांची मुलगी यापलिकडं त्यांची फारशी ओळख नव्हती. 2006 मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांचं नाव राजकारणात चर्चेत आलं. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं.  

7/14

शरद पवार यांनी त्यावेळी विचारलं की, 'पण भाजपाचं काय?' त्यावर बाळासाहेब म्हणाले होते की, 'कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे.' अशाप्रकारे सुप्रिया सुळे यांची केंद्रात बिनविरोध निवड झाली.  तेव्हापासून सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थानं सुरूवात झाली.

8/14

राज्यातील युवतींना पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुरू झाली. त्यानंतर राज्यात होणाऱ्या स्त्री-भ्रूण हत्यांविरोधात सुप्रिया सुळे पुढाकार घेतला. याविरोधात त्यांनी राज्यभर अभियान केली. अशाप्रकारे त्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सुप्रियाताई म्हणून जवळच्या वाटू लागल्या.   

9/14

शरद पवारांनीही कायम लोकांमध्ये फिरुन हा पक्ष उभा केला. त्यांनी राज्यापासून केंद्रापर्यंत माणसं जोडली. वडिलांचा हाच वारसा सु्प्रिया ताई खऱ्या अर्थाने पुढे नेताना दिसत असतात. कार्यक्रमांना हजर राहणं, वडिलधाऱ्यांसोबतच नव्या पिढीशीही त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आहे.   

10/14

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनच्या वेळी वडिलांची सावली आणि आधार असलेली ही लेक दिसून आली. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा तेव्हा प्रत्येकाला भावूक करुन गेला. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले.

11/14

अजित पवार-शरद पवार यांचं काका-पुतण्याचं नातं आहे. सु्प्रिया ताई आणि अजितदादाचे नातंही तेवढं खास आहे. घरात मोठा भाऊ असणारा अजित पवार मात्र राजकारणातही कायम सुप्रिया सुळेंचा मोठा भाऊ होण्याचं प्रयत्न करत असतात. 

12/14

सुप्रिया यांचं भाषेवरही तगड प्रभुत्व आहे. त्यांच्या भाषणाला मोठ्या संख्येने लोक जातात आणि प्रभावीत होतात. अगदी कोणाची मनधरणी असो किंवा पक्षातील नेत्यांशी संवाद असो त्या कायम पुढे राहिल्या आहेत. पक्षातील नेत्यांवर जेव्हा संकट आलं तेव्हा त्याचा पक्षासोबत आणि त्या नेत्यांच्या कुटुंबासोबत कायम खंबीरपणे उभा दिसतात. 

13/14

सु्प्रिया सुळे यांची अजून एक खासियत म्हणजे त्यांची कॉटनची साधी साडी...त्यांचा हा पेहरावामुळे त्या सर्वसामान्यांना आपल्याशा वाटतात. त्यांनी जनतेच्या मनात घर केलं आहे. प्रत्येक घरगुती कार्यक्रम असो किंवा कोणाच्या घरात अगदी जमीनवर बसून जेवण करणं असो. त्यांची प्रत्येक बाजू शरद पवारांचे संस्कार आणि त्याचं जीवन या लेकीतून दिसतं. 

14/14

सुप्रिया सुळे या सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ, पोस्ट आणि ट्वीट क्षणात व्हायरल होतं असतात.