Rohit Sharma: रोहितचं कर्णधारपद काढण्यावरून सूर्यकुमार नाराज? सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

Rohit Sharma: शुक्रवारी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. दरम्यान या निर्णयानंतर शनिवारी मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादवची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Surabhi Jagdish | Dec 16, 2023, 11:32 AM IST
1/7

शुक्रवारी मुंबई इंडियन्सने शुक्रवारी संध्याकाळी हार्दिक पंड्याला 2024 च्या सिझनसाठी टीमचा कर्णधार म्हणून घोषित केलं गेलं. 

2/7

दरम्यान मुंबई इंडियन्सच्या या निर्णायवर चाहते मात्र नाराज झाले आहेत. 

3/7

अशातच आता मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर ही पोस्ट केली. 

4/7

सूर्याने त्याच्या सोशल मीडियावर अकाऊंट इन्स्टाग्रामवर, हार्ट ब्रोकचं इमोजी पोस्ट केलं आहे. 

5/7

सूर्याच्या या पोस्टमुळे चाहते त्याचे विविध अर्थ काढतायत. 

6/7

यावेळी सूर्याच्या या पोस्टचा अर्थ रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्याप्रकरणी असल्याचं म्हटलं जातंय.  

7/7

दरम्यान या पोस्टबाबत सूर्यकुमार यादव काय खुलासा करतो हे पाहावं लागणार आहे.