कॅप्टन्सीची जादू....! कर्णधारपद मिळताच Suryakumar Yadav ची बॅट तळपली

गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार यादववर त्याच्या खराब कामगिरीमुळे टीका करण्यात येत होती. मात्र अखेर आज सूर्याने कॅप्टन्सीची धुरा सांभाळत गोलंदाजांचाही समाचार घेतला आहे.

Apr 16, 2023, 20:06 PM IST
1/5

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची धुरा SKY म्हणजेच सूर्यकुमार यादवने सांभाळली होती. 

2/5

आजच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आजारी असल्याने त्याचा टीममध्ये समावेश केला नव्हता. त्यामुळे केकेआर विरूद्धच्या सामन्यात सूर्याने टीमचं नेतृत्व केलं. मात्र रोहित इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता

3/5

सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या टीमची धुरा सांभाळली होती. आणि याच सामन्यात त्याने विजय देखील मिळवून दिला.

4/5

कर्णधारपदाची धुरा मिळताच सूर्याची बॅट देखील तळपली. 

5/5

सूर्यकुमारने आजच्या सामन्यात 25 बॉल्समध्ये 43 रन्सची खेळी केली.