Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: अशी दिसते बाघाची रियल लाइफ बावरी, पाहा Tanmay vekaria चे कुटुंब

TMKOC Tanmay Vekaria's family: तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक पात्र लोकांना खूप लोटपोट हसवत आहे. ते पात्र आहे बाघा याचे. बाघाची भूमिका ही अनेक वर्षानुवर्षे तन्मय वेकारिया साकारत आहे. TMKOC या शोमध्ये त्याला बावरी खूप आवडते, पण बाघाच्या खऱ्या आयुष्यातील बावरीला तुम्हा कधी भेटला आहात का? नसेल तर जाणून घ्या ती कशी दिसते आणि आहे.

Surendra Gangan | Jan 22, 2023, 12:40 PM IST
1/5

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मा शोमध्ये अनेक प्रकारची पात्र पाहायला मिळतात. ही पात्र अजब-गजब भूमिका साकारात आहेत. बाघाची भूमिका देखील आहे ती दिसायला विचित्र आहे, पण बाघाच्या वागण्याने लोकांचे खूप मनोरंजन होत आहे. तन्मय वेकारिया (Tanmay Vekaria) अनेक वर्षांपासून ही भूमिका साकारत आहे. हे पात्र तुम्हाला चांगले माहित आहे, पण प्रत्यक्षात तन्मय कोणत्या प्रकारचे जीवन जगतो आणि त्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत, ते तुम्हाला माहिती आहे का? 

2/5

बाघा TMKOC या हा शोमध्ये बावरीला खूप पसंत करत आहे. बावरी त्याला खूप आवडते. पण तुम्ही त्याच्या खऱ्या आयुष्यात बावरी म्हणजेच त्याची पत्नी पाहिली आहे का?  बाघा शोमध्ये अनेक वर्षांपासून बॅचलर दाखवला आहे, परंतु वास्तविक जीवनात तो विवाहित आहे. आणि तो बाबाही झाला आहे. तन्मयच्या पत्नीचे नाव मितसु आहे, जिचे फोटो तो त्याच्या इंस्टाग्रामवर अनेकदा शेअर करताना दिसतो. 

3/5

याशिवाय तन्मय हा आता दुसऱ्या मुलाचा बापही झाला आहे. जिशान वेकारिया आणि वृष्टी वेकारिया अशी त्याच्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलं मोठी झाली आहेत आणि बाघाच्या म्हणजेच तन्मयच्या अगदी जवळ आहेत. तन्मय त्याच्या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फोटो पोस्ट करतो आणि अनेकदा तो कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. 

4/5

तन्मयला नेहमीच अभिनयाची आवड होती, पण कुटुंबासाठी तो बँकेत नोकरी करत असे. अनेक वर्षे बँकेत काम केल्यानंतर तन्मयने अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. त्याचे वडील आधीच अभिनयाच्या क्षेत्रात काम करत होते.  ते गुजराती चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत.

5/5

तन्मय याला 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याने अनेक छोट्या-छोट्या भूमिका केल्या, पण नंतर त्याची प्रतिभा पाहून त्याला बाघाची भूमिका ऑफर करण्यात आली, ज्याने तन्मयचे आयुष्यच बदलून टाकले. या एका भूमिकेने त्याला रातोरात स्टार बनवले आणि वस्तुस्थिती अशी आहे की आज तो तन्मयच्या नावाने नाही तर बाघाच्या भूमिकेने ओळखला जातो.