'या' व्यक्तीच्या नावावरुन ठेवण्यात आलंय ताडोबा-अंधारी अभयारण्याचे नाव; वाचा रंजक इतिहास

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी वरदान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. या जंगलाला वाघांचे जंगल असं देखील म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण हे जंगल सफारी आहे. पण तुम्हाला ताडोबा हे नाव कुठून आलं माहितीये का?

| Jan 08, 2025, 13:47 PM IST

Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी वरदान आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. या जंगलाला वाघांचे जंगल असं देखील म्हणतात. ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण हे जंगल सफारी आहे. पण तुम्हाला ताडोबा हे नाव कुठून आलं माहितीये का?

1/7

'या' व्यक्तीच्या नावावरुन ठेवण्यात आलंय ताडोबा-अंधारी अभयारण्याचे नाव; वाचा रंजक इतिहास

Tadoba Andhari Tiger Reserve know the history behind name taru dev

 ताडोबा हे विदर्भाचे रत्न आहे. चंद्रपूर जिल्ह्याला निसर्गदेवतेचे वरदान लाभले आहे. असं म्हणात ती ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे नाव स्थानिक आदिवासींच्या नावावरुन पडले असल्याचे म्हटलं जाते. 

2/7

विदर्भातील हे जंगल आणि वेगळेपणा इंग्रजांनी ओळखला आणि 1935 मध्ये ताडोबा जंगलाची स्थापना झाली. तर, 1955 मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषणा झाली. 1986 साली अंधारी हा भाग अभयारण्याची घोषणा करण्यात आली. 

3/7

ताडोबा उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ किमी इतके आहे आणि इथले जंगल ५०९ किमी एवढे आहे.

4/7

तारू नावाचा एक गोंड समाजाचा आदिवासी तरुण होता. तो तिथल्या गावचा प्रमुख होता. गावाच्या तलावाजवळ त्याची एका वाघासोबत लढाई झाली. आपल्या गावाच्या संरक्षणासाठी तारुने वाघासोबत लढाई केली. त्यामध्ये तारुचा विजय झाला. 

5/7

 तारुचा विजय झाला असला तरी तो गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सन्मानार्थ तलावाजवळ त्याचं मंदिर बांधलं गेलं. त्याच्या नावावरुन या जंगलाचे नाव तारू ठेवण्यात आलं. 

6/7

तारूला तारूबा असं देखील म्हटलं जायचं. त्यावरुनच या अभयारण्याचे नाव ताडोबा असं पडलं. येथील लोक वाघाला कुलदैवत मानतात असंदेखील म्हटलं जातं. 

7/7

ताडोबामधील नदी झाडांच्या मधून वाहते त्यामुळं या जंगलात नेहमीच काळोख असायचा. त्यामुळं याला अभयारण्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असं म्हटलं जातं.