टाटाची कमाल, 2 लाख इलेंक्ट्रिक कारची विक्री, आता बंपर ऑफर

भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रिक कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आता टाटा कंपनीने 2 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. 

Soneshwar Patil | Feb 20, 2025, 17:47 PM IST
1/7

गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अनेक परदेशी कंपन्या देखील त्यांच्या ईव्ही कार लॉन्च करत आहेत. 

2/7

मात्र, देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी, टाटा मोटर्स कंपनी बाजारपेठेत लीडरची भूमिका बजावत आहे. टाटा मोटर्सने आतापर्यंत 2 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. 

3/7

यासोबतच कंपनी त्यांच्या EV कारवर आकर्षक फायदे देखील देत आहे. यामध्ये कंपनी इलेक्ट्रिक कारवर 100% ऑन-रोड फायनान्स देत आहे. त्यासोबतच 6 महिने मोफत चार्जिंगचा लाभ देखील दिला जात आहे. 

4/7

कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि मोफत चार्जर बसवण्याची सुविधा देखील देत आहे. ही ऑफर पुढील 45 दिवसांसाठी असणार आहे. 

5/7

ही ऑफर कंपनीच्या टिएगो ईव्ही, टिगोर ईव्ही, पंच ईव्ही, नेक्सन ईव्ही आणि कर्व ईव्ही यासह 5 इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. 

6/7

याशिवाय भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये कंपनीने दोन नवीन इलेक्ट्रिक कार आणि त्यांची संकल्पना देखील प्रदर्शित केली आहे. 

7/7

Tiago EV या इलेक्ट्रिक कारची किंमत 7.99 लाख रुपये इतकी आहे. जी एका चार्जमध्ये 250 ते 315 किमी अंतर पार करू शकते.