6.13 लाखांच्या SUV ची धडाधड होतेय विक्री; कंपनीने तयार केल्या 4 लाख गाड्या

सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सची पंच सर्वात जास्त लोकप्रिय आहे. वर्ष अर्धं संपलं असून यादरम्यान 1,10,30 युनिट्सची विक्री झाली आहे.   

Aug 02, 2024, 18:02 PM IST

सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सची पंच सर्वात जास्त लोकप्रिय आहे. वर्ष अर्धं संपलं असून यादरम्यान 1,10,30 युनिट्सची विक्री झाली आहे. 

 

1/11

गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत एसयुव्ही कारची मागणी वाढली आहे. कमी किंमत, चांगला मायलेज आणि लो मेंटेनन्स यामुळे या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे.   

2/11

सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सची पंच सर्वात जास्त लोकप्रिय आहे. वर्ष अर्धं संपलं असून यादरम्यान 1,10,30 युनिट्सची विक्री झाली आहे.   

3/11

6.13 लाखांपासून टाटा पंचची किंमत सुरु होते. टाटा पंच बाजारात आली तेव्हा बेस्ट सेलर ठरली होती.   

4/11

पंचला सर्वात आधी ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता कंपनीने 4 लाख युनिट्सला फॅक्टरीतून रोलआऊट केलं आहे. म्हणजेच गेल्या 34 महिन्यात याचे 4 लाख युनिट्स तयार करण्यात आले आहेत.  

5/11

लाँच झाल्यानंतर फक्त 10 महिन्यात कारच्या 1 लाख युनिट्सची विक्री झाली होती. 2023 पर्यंत त्यांनी 3 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली होती.  

6/11

टाटा पंचच्या विक्रीत 30 टक्के योगदान सीएनजी व्हेरियंटचं असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय पंच इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर 17.7 टक्के आणि पेट्रोल व्हेरियंटचं 53 टक्के योगदान आहे.   

7/11

टाटा पंच 1.2 लीटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह कंपनी फिटेड CNG व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या सीएनजी व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 7.23 लाख रुपये आहे.  

8/11

याचं पेट्रोल व्हेरियंट शहरात सामान्यत: 12 ते 14 किमी /लीटर आणि हायवेवर जवळपास 17 ते 18 किमीचा रिअर वर्ल्ड मायलेज देते.   

9/11

यामध्ये ड्युअल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स  डिस्ट्रिब्युशनसह एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिव्हर्सिंग कॅमेरा सारखे फिचर्स आहेत.   

10/11

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली. यात सनरुफ, ऑटोमॅटिक हेडलँप, 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटमेंट सिस्टम मिळतो.   

11/11

Tata Punch EV म्हणजेच त्याचा इलेक्ट्रॉनिक व्हेरियंट 25-35 kWh च्या दोन बॅटरी पॅकसह येतो. जो 315-421 किमीपर्यंतचा ड्रायव्हिंग रेंज देतो. याची किंमत 10.99 लाखांपासून सुरु होते.