Love Story की Hate Story? प्रीति झिंटानं लग्न केलं, पण वयाच्या 53 व्या वर्षीही अविवाहित नेस वाडिया!

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानसोबत वादामुळे पुन्हा एकदा बिझनेसमॅन नेस वाडिया चर्चेत आला आहे. कधीकाळी तो प्रीति झिंटासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण काही वादांमुळे चक्क प्रीति झिंटानं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...

| Aug 02, 2024, 17:48 PM IST
1/9

नेस वाडिया आणि प्रीति झिंटा हे दोघेही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होते. प्रीति झिंटा बॉलिवूडवर राज्य करायची आणि नेस देखील फॅमिली बिझनेस सेट करत होते. त्यांची भेट झाली मैत्री झाली आणि हळू-हळू एकमेकांवर प्रेम झालं. फेब्रुवारी 2005 मध्ये प्रीति झिंटानं नेस वाडियासोबतचं तिचं नातं कंफर्म केलं. 

2/9

2008 मध्ये IPL मध्ये किंग्स इलेव्हनं पंजाबमध्ये दोघांनी एक पार्टनर म्हणून सुरुवात केली. पण एका वर्षानंतर दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगू लागली. असं म्हटलं जातं की नेसची आई मौरीन यांना प्रीति आवडत नव्हती. रिपोर्ट्सनुसार, पुन्हा एकदा प्रीति झिंटाची तुलना ही जेब्राशी केलं होतं. 

3/9

मात्र, 2009 मध्ये त्यांची ही लवस्टोरी हेट स्टोरी झाली. असं म्हटलं जातं की एका पार्टीत नेस वाडियान प्रीति झिंटाला कानशिलात लगावली होती. पुढे जाऊन दोघांचं नातं तुटलं. 2013 मध्ये एक मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिला. 

4/9

त्यानंतर 13 जून 2014 मध्ये प्रीति झिंटा आणि नेस वाडिया पुन्हा एकदा चर्चेत आले. दोघांमधील वाद खूप जास्त वाढले होते. प्रीतिनं नेस वाडियाच्या विरोधात विनयभंग, धमकावणे आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती.

5/9

प्रीति म्हणाली, 'मी दहा वर्षांपासून नेस वाडियाला ओळखते. आमच्या दोघांमध्ये नातं देखील होतं. आजही मी तिच्यासोबत किंग्स इलेव्हन पंजाबचे सह-मालक आहोत. आम्ही आता प्रोफेशनली जोडलेले आहोत. आम्ही काही काळ काहीही बोलत नव्हतो. कामाविषयी काही बोलतो तर वाद होतो.'

6/9

प्रीति झिंटानं आरोप केले होते, 'नेस वाडियानं माझ्यासोबत गैरवर्तन केलं आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला. त्याच्या या वागणूकीमुळे मला माझ्या मित्र-परिवारासमोर आणि  कुटुंबासमोर लाज वाटावी लागली. मला अनेकदा त्यानं धमकी दिली आणि घाबरवलं.' 

7/9

प्रीति झिंटानं आरोपात असं म्हटलं होतं की 30 मे 2014 ला ती नेस वाडियासोबत वानखेडे स्टेडियममध्ये होती. त्यावेळी वाडियानं तिला धमकी दिली होती की ती फक्त एक अभिनेत्री आहे. तो तिला गायब करू शकतो. तो खूप पावरफुल आहे. या घटनेनंतर ती घाबरली होती.  

8/9

त्याशिवाय प्रीतिनं दावा केला होता की नेस वाडियानं तिच्यावर जळती सिगरेट फेकली होती. इतकंच नाही तर तिला एका रूममध्ये बंद देखील केलं होतं. दुसरीकडे वाडियानं हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. 

9/9

2018 मध्ये हायकोर्टानं केस रद्द केली. प्रेसशी बोलत असताना वाडियाचे वकील आबाद पोंडा यांनी सांगितलं होतं की "नेसविरुद्धचा खटला रद्द करण्यात आला आहे. आम्हाला न्यायालयाने आणखी काही बोलू नये, असे सांगितले आहे."