सिंगल चार्जमध्ये 550 KM धावणार! Maruti ची नवी कार Mahindra, MG आणि Hyundai ला देणार टक्कर

Maruti  eVX SUV कार कधी लाँ होईल. या कारचे फिचर्स काय असतील. याची किंमत किती असेल जाणून घेवूया. 

Dec 08, 2023, 19:01 PM IST

Maruti Suzuki Upcoming Electric Car:  सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना मोठी डिमांड आहे. MG, TATA, Mahindra, Hyundai सारख्या अनेक बड्या ब्रँडनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी कार विक्रेता कंपनी मारुती सुझुकी देखील आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. नविन वर्षात Maruti  eVX SUV लाँच होणार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 500 Km धावेल असा दावा कंपनीने केला आहे. 

1/7

सध्या मार्केटमध्ये MG, TATA, Mahindra, Hyundai सह अनेक बड्या ऑटोमोबाईल ब्रँडच्या कार लाँच झाल्या आहेत. 

2/7

सध्या ही कार चाचणीच्या टप्प्यात आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात ही कार मार्केटमध्ये दाखल होईल. याची किंमत 22 ते 24 लाखांपर्यंत असू शकते. 

3/7

या कारमध्ये 60kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळेल. सिंगल चार्जमध्ये ही कार 550 Km पर्यंतची रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. 

4/7

 मारुती eVX SUV ची लांबी 4.3 मीटर, रुंदी 1.8 मीटर, उंची 1.6 मीटर आणि व्हीलबेस 2.7 मीटर इतकी असले. या कारचा लूक स्पोर्टी असणार आहे. 

5/7

या कारमध्ये अनेक टेक्नॉसॅव्ही फिचर्स मिळणार आहेत. या ऑटोमॅटिक कारमध्ये अनेक ड्राईव्हिंग मोड मिळणार आहेत.   

6/7

Maruti  eVX SUV कारचे उत्पादन गुजरातमधील मारुती सुझुकीच्या हंसलपूर येथील वर्कशॉपमध्ये केले जात आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने या इलेक्ट्रिक कारबाबत मार्च 2022 मध्ये गुजरात सरकारसोबत एक मेमोरँडम केला होता.

7/7

MG, TATA, Mahindra, Hyundai बड्या ब्रँडना टक्कर देण्यासाठी मारुती कंपमनी देखील सज्ज झाली आहे. 2024 मध्ये  Maruti  eVX SUV लाँच होणार आहे.