महाराष्ट्रातील रहस्यमयी खंडोबा मंदिर! जेजुरी गडावर खरचं नऊ लाख पायऱ्या आहेत का?
जेजुरी गड हा समुद्रसपाटीपासून 2355 फूट उंचीवर आहे. जाणून घेवूया खंडोबा मंदिराची रहस्ये.
Pune Jejuri Temple : यळकोट यळकोट जय म्हालार... जेजुरीचा खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीत येत असतात. मनी आणी मल्ल या दोन राक्षसांनी भगवान ब्रहामाची तपस्या केली. ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले. पृथ्वीवर लोकांना ते त्रास देऊ लागले. मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी शंकर खंडेरायाच्या रुपात पृथ्वीवर अवतरेल अशी अख्यायिका आहे.





