एक्स्प्रेस वे वर असा सुरु आहे टोलचा महाझोल!

राज्यभर सध्या टोलचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यातच आता टोलवसुलीबाबत धक्कादायक माहिती समोर आलेय. 

Oct 10, 2023, 23:34 PM IST

Mumbai Pune expressway : टोलदरवाढीवरुन मनसेनं छेडले आहे. यातच आता  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरवर्षी 1 हजार 200 कोटींची टोलवसुली होत असल्याचं आकडेवारीवरून जाहीर होतं आहे. एक्स्प्रेस वे वर टोलचा कसा महाझोल सुरु आहे पाहूया. 

1/7

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या बांधकामाचा खर्च 5000 कोटी आहे. तर, दरवर्षी 1 हजार 200 कोटींची टोलवसुली केली जात आहे.

2/7

टोल वसुली संदर्भातील आकडेवारी डोकं चक्रावणारी आहे. 

3/7

टोल वसुली आणि खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली जातेय. 

4/7

2002 ते 2023 या काळात तब्बल 22 हजार कोटींचा टोल वसूल झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  

5/7

वर्षभरात कोट्यावधीचा टोल वसुल केला जातो. 

6/7

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर महिन्याला 100 ते 110 कोटींची टोलवसुली होते. 

7/7

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरवर्षी 1 हजार 200 कोटींची टोलवसुली होत असल्याचं आकडेवारीवरून जाहीर होतंय