भिंतीपासून किती दूर असावा फ्रिज? या Fridge Safety बद्दल 99% लोकांना कल्पनाच नाही

How Much Space Between Fridge And Wall Needed : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्रिज नसलेली घरं सापडणं आजच्या जमान्यामध्ये तसं फार कठीण. अनेक घरांमध्ये फ्रिज किचनमध्येच ठेवला जातो मात्र काही घरांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार एखाद्या रुममध्ये अथवा हॉल आणि किचनच्या दाराजवळ फ्रिज ठेवला जातो. पण फ्रिज भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणं फार महत्त्वाचं असतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल आपण जाणून घेऊयात...

Apr 25, 2023, 12:14 PM IST
1/9

fridge safety tips

फ्रिज घरामध्ये ठेवताना तो भिंतीपासून किती दूर ठेवावा यासंदर्भातील काही अलिखित नियम आहेत. याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. फ्रिज योग्य प्रकारे ठेवला नाही तर तो खराब होऊ शकतो. त्यामुळेच याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

2/9

fridge safety tips

फ्रिजचा वापर मेट्रो शहरांमध्ये जवळजवळ सर्वांच्या घरात होतो. आपल्यापैकी अनेकांनी तर लहानपणापासूनच फ्रिज पाहिला असणार.

3/9

fridge safety tips

फ्रिज हा बहुतांशी लोक किचनमध्ये ठेवतात तरी काही घरांमध्ये फ्रिज हॉल किंवा एखाद्या रुममध्ये अथवा एखाद्या कॉर्नरला ठेवल्याचं आढळून येतं. सामान्यपणे फ्रिज हा उपलब्ध जागेमध्ये मावतोय की नाही त्यावर तो कसा आणि कुठे ठेवायचा हे ठरवलं जातं.

4/9

fridge safety tips

तुम्ही कुठेही फ्रिज पाहिला असेल तर तो भिंतीला चिटकवून ठेवल्याचं दिसून येतं. मात्र असं करणं हे फ्रिजच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. फ्रिज अगदी भिंतीला खेटून ठेवू नये. फ्रिज भिंतीपासून किती दूर ठेवावा यासंदर्भात काही अलिखित नियम आहेत.

5/9

fridge safety tips

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार फ्रिज हा भिंतीपासून 6 ते 10 इंच दूर ठेवला पाहिजे. असं का सांगितलं जातं हे सविस्तर जाणून घेऊयात. फ्रिजला थंड ठेवण्यासाठी एक गुंतागुंतीची यंत्रणा कार्यरत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये फ्रिजच्या मागील बाजूस असलेल्या ग्रीलच्या माध्यमातून उष्ण हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळेच फ्रिज अगदी भिंतीला चिटकवून ठेऊ नये असं सांगितलं जातं.

6/9

fridge safety tips

तुम्ही जर फ्रिज अगदी भिंतीला चिटकवून ठेवत असाल तर त्यामधून निघणारी गरम हवा बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे फ्रिजला थंड करणाऱ्या यंत्रणेवर अधिक जोर पडतो. त्यामुळे विजेचा अधिक वापर केला जातो.

7/9

fridge safety tips

फ्रिज हा भिंतीपासून दूर ठेवण्याबरोबरच फ्रिजपासून हीटर तसेच अन्य तापणाऱ्या वस्तूही दूर ठेवल्या पाहिजेत. कोणतीही झटकण तापणारी वस्तू फ्रिजजवळ ठेऊ नये.

8/9

fridge safety tips

गरम आणि तापणाऱ्या गोष्टी फ्रिजजवळ ठेवल्या तर आतील आणि बाहेरील तापमानामध्ये मोठी तफावत निर्माण होतो आणि फ्रिजमधील कंडेन्सेशन वाढतं. त्यामुळे फ्रिज आतून ओला होतो आणि त्यात बर्फ साठू लागतो. हे फ्रिजसाठी फारसं फायद्याचं नसतं.

9/9

fridge safety tips

फ्रिजसंदर्भातील या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तो कमी खर्चामध्ये म्हणजेच वीजेचं बिल आणि मेन्टेन्समध्ये अधिक चांगली सेवा देतो.