एक चूक आणि बँकेतून 3650 कोटी रुपये गायब!

एक छोटीशी चूक वेळोवेळी महागात पडू शकते आणि पैशांच्या बाबतीत तर ती जबाबदारीची गोष्ट असते. अशावेळी खूप मोठी अडचण ओढवली जाऊ शकते. असाच एक प्रकार नामांकीत बँकेत घडल्यानं खळबळ उडाली आहे. 

Feb 18, 2021, 19:53 PM IST
1/6

2/6

अमेरिकेतील एक नामांकित बँक म्हणजे सीटी बँक. या बँकेकडून रेवलॉन कॉस्मेटिक कंपनीच्या ऋणदात्यांकडून सीटी बँकेला 58 कोटी रुपये व्याज देणं बाकी होतं. मात्र बँकेकडून 10 पट अधिक 6565 कोटी रुपये (जवळजवळ 900 डॉलर्स) त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. हा व्यवहार गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कऱण्यात आला होता.   

3/6

काही कर्जदारांनी हे पैसे प्रामाणिकपणे बँकेला परत केले. मात्र त्यापैकी 10 कर्जदात्यांनी 3650 कोटी रुपये बँकेला परत दिलेच नाहीत. त्यावेळी अमेरिकेतील सीटी बँकेनं न्यान मागण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

4/6

अमेरिकेतील न्यायालयानं हे अजब कॉर्पोरेट क्लाइंट प्रकरण असल्याचं सांगितलं. अशा प्रकारे डिजिटलपद्धतीनं चूक होऊ शकते. ती तत्काळ सुधारली जाऊ शकते. 

5/6

सीटी बँकेनं जर नजरचुकीनं हे पैसे ऑनलाइन स्वरुपात पाठवले असतील तर त्यांनी तत्काळ तक्रार दाखल का केली नाही असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे. बँकेनं त्यावर तत्काळ कारवाई करणं गरजेचं होतं. एक दिवस उलटून गेल्यानंतर बँकेनं यावर कारवाई करायला सुरुवात केली.   

6/6

अशा पद्धतीनं केलेला हा घोळ जाणीवपूर्वक असल्याचा संशयही यावेळी न्यायालयानं व्यक्त केला. तर भारतातही एका सरकारी बँकेकडून अशा पद्धतीची चूक झाली होती. मात्र त्यावेळी तत्काळ कारवाई केल्यामुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती देण्यात आली आहे.