जगातील सर्वात मोठा डिजास्टर चित्रपट; ₹12,17,23,86,930 खर्च केला, पण कमाई झाली...

चित्रपट रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना एकच धाकधुक असते ती म्हणजे चित्रपट किती कमाई करतो. जर चित्रपट चालला तर निर्मात्यांचे नशीबच चमकते आणि चित्रपट फ्लॉप झाला तर निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागतं.

Mansi kshirsagar | Oct 06, 2024, 13:43 PM IST

चित्रपट रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांना एकच धाकधुक असते ती म्हणजे चित्रपट किती कमाई करतो. जर चित्रपट चालला तर निर्मात्यांचे नशीबच चमकते आणि चित्रपट फ्लॉप झाला तर निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागतं.

1/7

जगातील सर्वात मोठा डिजास्टर चित्रपट; ₹12,17,23,86,930 खर्च केला, पण कमाई झाली...

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

 चित्रपट हिट झाला तर निर्माता, दिग्दर्शकांना फायदा होता. इतकंच नव्हे तर चित्रपटातील कलाकारांनाही फायदा होता. दुसऱ्या मोठ्या चित्रपटांचेदेखील ऑफर येतात. चित्रपट हिट झाला तर अभिनेता आणि दिग्दर्शक सर्वांचेच नशीब फळफळते. मात्र, फ्लॉप झाल्यावर नेमकी त्याच्या उलट परिस्थिती होते. चांगलं बजेट असलेला चित्रपट फ्लॉप झाल्यास निर्मात्यांना मोठं नुकसान सोसावं लागतं. 

2/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

 2005मध्ये आलेल्या एका चित्रपटासोबत असंच काहीसं झालेलं. बिगबजेट असलेला हा चित्रपट मात्र फार काही चालला नाही. प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी पाठ फिरवली. करोडो रुपयांचे नुकसान झाले. चित्रपटाचे नाव जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील झाले. 

3/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

आयएमडीबीच्या 'THE BIGGEST BOX OFFICE FLOPS IN MOVIE HISTORY! या यादीत पाचव्या नंबरवर एका हॉलीवूड चित्रपटाचे नाव आहे. तो चित्रपट म्हणजे सहारा. 2005 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटात तगडी स्टारकास्ट होती. मात्र तरीही निर्मात्यांना  $144,857,030 नुकसान सोसावं लागलं. 

4/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

 सहारा एक अमेरिकी अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन ब्रेक ईसनर यांनी केलं होतं. 1992 साली याच नावाने एक कांदबरी आली होती. यावर हा चित्रपट आधारित आहे. कलाकारांबाबत बोलायचे झाल्यास यात स्टीव जहान, मैथ्यू मेककोनाघी आणि पेनेलोप क्रुज मुख्य भूमिकेत आहेत. 

5/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

'सहारा'च्या कथेबद्दल सांगायचे तर सहारा ही वाळवंटात हरवलेल्या युद्धनौकेचे शोधकार्य कसं करण्यात येतं हे दाखवण्यात आलेलं आहे. उत्तर आफ्रिकेच्या संपूर्ण भागात पसरलेले सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. सर्वात उष्ण असं वाळवंट आहे.

6/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

सहारा फ्लॉप झाल्यानंतर त्याचा उल्लेख टाइम मासिकातही केला गेला होता. येथे जगातील चौथा सगळ्यात फ्लॉप चित्रपट असल्याचे म्हटलं होतं.

7/7

This is Biggest Disaster Movie Sahara Losing Rs 12 17 23 86 930 money Flop Film of All Time

'सहारा'ने जगभरात 120 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती. हा आकडा जरी चांगला असला तरी 'सहारा'च्या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाच्या मार्केटिंग आणि निर्मितीसाठी कितीतरी जास्त पैसा खर्च केला होता. एकूण खर्च 240 दशलक्ष डॉलर्स होता. अशा परिस्थितीत हा चित्रपट पूर्ण रक्कम वसूल करू शकला नाही. या अहवालानुसार, 'सहारा'मुळे निर्मात्यांना $144,857,030 (रु. 1217 कोटी) चे नुकसान झाले आहे.