रोज पोहे खाणाऱ्यांनो काळजी घ्या... होऊ शकतं मोठं नुकसान

बहुतेक लोक नाश्त्यामध्ये अशा गोष्टींचा प्राधान्य देतात जे खाण्यास हलके आणि आरोग्यदायी असतात आणि लवकर तयार होतात. पोह्यांच्याही यामध्ये समावेश होतो. कार्बोहायड्रेट, फायबर आणि प्रोटीनने भरपूर असलेले पोहे खायला चविष्ट असतात. पण जास्त पोहे खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. 

Feb 03, 2023, 18:30 PM IST
1/7

poha carbohydrates

पोषणतज्ञ तज्ञ वरुण कात्याल यांच्या माहितीनुसार, अनेक नाश्त्याच्या अनेक पर्यायांपेक्षा पोहे पौष्टिक मानले जातात. पण त्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेटच्या प्रमाणामुळे तुमचे वजन वाढवू शकते.  

2/7

weight gain

रोज पोहे खाल्ल्याने वजन वाढण्यासोबतच लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय शेंगदाणे, बटाटे यांचाही वापर पोहे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे या पदार्थांमुळे शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो.

3/7

poha rice

पोहे साधारणपणे पांढऱ्या तांदळापासून बनवले जातात. मधुमेहाच्या रुग्णांना भात टाळण्याचा सल्ला दिला जातो. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रोज पोहे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पोहे खाणे टाळावे.

4/7

brekfast poha

नाश्त्यात पोहे खाल्ल्याने अनेकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोहे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले जाणवते. त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकते.

5/7

poha iron

पोह्यात भरपूर लोह असते त्यामुळे त्याचे अतिसेवन केल्यास शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने, व्यक्तीला उलट्या, डिहायड्रेशन, जुलाब सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

6/7

row poha

दुसरीकडे, कच्चे पोहे खाल्ल्याने तुमचे दात आणि जबडा दुखू शकतो. कच्चे पोहे चघळायला अवघड असतात त्यामुळे एखाद्याला  दातदुखीचाही त्रास होऊ शकतो.

7/7

poha eating

पोहे नेहमी मर्यादित प्रमाणात खावेत. आठवड्यातून दोन ते तीन दिवस नाश्त्यात पोहे खाऊ शकता. एक वाटीपेक्षा जास्त पोहे खाऊ नयेत.