Lockdown दरम्यान बांगलादेशात लाखोंची गर्दी

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) बांगलादेशातही लॉकडाऊन आहे. मात्र बांगलादेशात लॉकडाऊनचं उल्लंघन करत लाखोंच्या संख्येने लोक ब्राम्हणबाडिया रस्त्यांवर उतरले. 

Apr 19, 2020, 14:43 PM IST

मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोक रस्त्यांवर आले आहेत. 

1/5

मौलाना जुबैर अहमद अन्सारी याचं 17 एप्रिल 2020 रोजी निधन झालं. त्यानंतर 18 एप्रिल रोजी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी उसळली होती.

2/5

मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोक मैदानात उतरलेत, जागा नसल्याने मदरशांच्या छतांवरही पोहचले आहेत.  

3/5

मौलाना जुबैर अहमद अन्सारी यांचं पार्थिव दफन करण्यापूर्वी ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील आशुगंज येथे अनेक किलोमीटरपर्यंत नेण्यात आलं.  

4/5

लॉकडाऊन काळात, लॉकडाऊनचं उल्लंघन करत, अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यांवर उतरले.  

5/5

बांगलादेश सरकारच्या सूचनांचं, लॉकडाऊनचं लोकांकडून उघडपणे उल्लंघन होताना दिसतंय. या लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येत नाहीये, या लोकांपैकी अनेकांनी मास्कही घातल्याचं दिसत नाही.