Tina Ambani : पहिल्यांदाच समोर आले अंबानींच्या 'या' नातवाच्या लग्नाचे फोटो; बच्चन कुटुंबापासून सुप्रिया सुळेपर्यंत मान्यवरांची हजेरी
Inside Pics : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) आणि क्रिशा शाह (Khrisha Shah) यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
Jai Anmol Ambani-Khrisha Shah Wedding Pictures : देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अंबानी कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वांनाच आवडतं. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांचा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) आणि क्रिशा शाह (Khrisha Shah) यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती आणि बच्चन कुटुंबासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी यात सहभाग घेतला होता. टीना अंबानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. (Tina Ambani Jai Anmol Ambani-Khrisha Shah Wedding Inside Pics nmp)