Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे.

Nov 17, 2022, 06:40 AM IST
1/6

जर एखाद्याची जीभ तपकिरी झाली असेल तर याचा अर्थ असा होतो की ते खूप चहा आणि कॉफी पितात. याशिवाय जे सीगारेट किंवा बिडी जास्त पितात. त्यांची जीभही तपकिरी होते. 

2/6

जेव्हा एखाद्याच्या जिभेचा रंग काळा पडतो, तेव्हा समजून घ्या की हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. हे कॅन्सरचेही लक्षण असू शकते आणि त्याशिवाय फंगल इन्फेक्शन आणि अल्सर असतानाही जीभ काळी पडते. जे जास्त धूम्रपान करतात, त्यांच्या जिभेलाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

3/6

जेव्हा तुमची जीभ गुलाबी, लाल होते याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड खूप कमी झाले आहे. 

4/6

जेव्हा एखाद्याच्या जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो, त्याचा अर्थ असा होतो की त्याला हृदयाशी संबंधित आजार असू शकतात. 

5/6

जेव्हा एखाद्याची जीभ पिवळी पडते तेव्हा याचा अर्थ शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता असते. यकृत किंवा पोटात समस्या असल्यास, जिभेवर पिवळा थर दिसू लागतो.  

6/6

जिभेवर पांढरा रंग येतो, याचा अर्थ असा होतो की तुम्ही तोंड व्यवस्थित साफ करत नाहीत. त्यामुळे जिभेवर पांढर्‍या धुळीचा थर जमू लागतो आणि जीभ पांढरी दिसते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)