Health Tips : तुमच्या जिभेचा रंग काळा तर झाला नाही ना? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

Tongue Colour:  अनेकदा औषधे किंवा कोणत्याही पदार्थामुळे काही वेळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलतो. परंतु जास्त काळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलला असेल तर काहीतरी गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. 

Nov 05, 2022, 15:10 PM IST

Tongue Colour Problem: जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यात उपचारासाठी जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? जेव्हा तुमच्या शरीरात कोणत्याही आजार असेल तर जिभेचा रंग हलका गुलाबी रंगाऐवजी काहीतरी बदलतो. प्रत्येक रंगाचा अर्थ काय ते जाणून घेऊया.

 शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच जिभेची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण पाहिले असेल, अनेक लोकांची जीभ काळी असते. मात्र ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने भविष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जिभेचा रंग आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगतो. जर तुमच्या जिभेचा रंग बदललेला असेल तर हा अनेक रोगांसंबंधीचा संकेत आहे. 

1/6

जेव्हा जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो. तेव्हा ते हृदयाशी संबंधित आजार दर्शवते. या स्थितीत हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही किंवा रक्तात ऑक्सिजनची कमतरता आहे.

2/6

जे लोक भरपूर चहा किंवा कॉफी पितात. त्यांच्या जिभेचा रंग तपकिरी असतो. याशिवाय सरगेट किंवा बिडीचे व्यसन करणाऱ्यांनाही तपकिरी जिभेचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गोष्टी टाळा.  

3/6

जर तुमच्या जिभेचा रंग गुलाबी वरून लाल होऊ लागला तर याचा अर्थ शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिडची खूप कमतरता आहे, त्यामुळे जिभेवर लाल ठिपके दिसू लागतात. त्याला जिओग्राफिक टंग असेही म्हणतात.

4/6

पांढर्‍या रंगाची जीभ म्हणजे तुम्ही तोंड नीट साफ करत नाही. त्यामुळे त्यावर पांढऱ्या घाणीचा थर जमू लागतो. त्यामुळे जिभेचा रंग असा होतो, काही वेळा फ्लू किंवा ल्युकोप्लाकियामुळे जीभ पांढरी दिसू लागते.

5/6

जर तुमच्या जिभेचा रंग पिवळा झाला असेल तर याचा अर्थ शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे. याशिवाय यकृत किंवा पोटातील समस्यांमुळे जिभेवर पिवळा थर चढू लागतो.   

6/6

जीभ गडद होणे हे गंभीर आजार दर्शवते. हे कर्करोगाचे लक्षण असू शकते आणि अनेकदा बुरशीजन्य संसर्ग आणि अल्सरमुळे जीभ काळी पडते. जे लोक भरपूर धूम्रपान करतात त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो.       (Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)