Bhagwad Gita Quotes: अर्जुनासारखं यश पाहिजे असेल तर 'या' पाच गोष्टी कधीच विसरू नका

Bhagvad Gita Quotes For Success: आयुष्यात यश कोणाला नको असतं? प्रत्येकजण पैसा आणि यश मिळवण्यासाठी धडपड असतो. जसं प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या वेगळी असते, तसंच काहींसाठी यशाची (Successful life) गणित देखील वेगळं असतं.  श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये जीवनातील यशाबद्दल अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. याच गोष्टींच्या आधारे अर्जुनाने विजय मिळवला होता.

| May 24, 2024, 12:05 PM IST
1/8

अर्जुन

श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये जीवनातील यशाबद्दल अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. याच गोष्टींच्या आधारे अर्जुनाने विजय मिळवला होता.

2/8

यशाचं गमक

आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.  ज्यामुळे मानवाला आयुष्याच्या यशाचं गमक कळतं.

3/8

कर्म करत रहा

श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे कर्म केलं पाहिजे. तुम्हीही नियमीत आपलं काम करत राहिलात तर तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल.

4/8

नियोजन

कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला यश मिळवायचं असेल तर नियोजन करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे योजना नसेल तर यश मिळवणं अवघड जातं.

5/8

निर्णय योग्य आहे का?

कोणतंही कार्य करण्याआधी तुमचा निर्णय योग्य आहे का? याची पडताळणी करा. त्यामुळे यश तुम्हाला नक्कीच मिळेल.

6/8

राग

अनेकदा रागराग केल्याने गोष्टी हातातून निसटून जातात. त्यामुळे राग, वासना आणि लोभ यापासून लांब राहिलं पाहिजे.

7/8

अपडेट रहा

यशस्वी होण्यासाठी स्वत:मध्ये बदल करत राहणं महत्त्वाचं आहे. स्वत:ला नेहमी अपडेट ठेवा.

8/8

Disclaimer

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)