....म्हणून 'या' बाईकस्वारांना हात दाखवून थांबवतात ट्रॅफिक पोलिस
Traffic Rules : बाईक चालवताना कधी ट्रॅफिक पोलिसांकडून किंवा पोलीस कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला अडवलंय का? अचानक तुम्हालाच का थांबवलं जातं असा प्रश्न अशावेळी तुम्हालाही पडतो. अशावेळी तुम्हाला सर्वात आधी लायसन्स मागितलं जातं. मात्र ते दिल्यानंतरही काही वेळी तुमच्यावर कारवाई केली जाते. पण ती का होते हे जाणून घेऊया...
वाहतूक नियमांचे कोणतंही उल्लंघन न करता तुम्ही जात असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला थांबवलं जातं. तर यामागे कारणही तसेच आहे. हेल्मेट घातलं नसेल, बाईकमध्ये काही बदल केले असतील तर पोलीस तुम्हाला हमखास थांबवतात.