महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावं माहितीयेत?

World Tribal Day 2023 : निसर्गाच्या सर्वाधिक जवळ असणाऱ्या, मातीशी घट्ट नातं असणाऱ्या या जमातींचंही समाजात मोठं स्थान आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील आदिवासी जमातींबद्दल...   

Aug 09, 2023, 11:11 AM IST

World Tribal Day 2023 : 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस. जगभरातील आदिवासी जाती- जमातींबाबत तुम्हाला किती माहितीये? देशाचं सोडा, ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या राज्यात कोणकोणत्या आदिवासी जमाती आहेत माहितीये? 

 

1/7

World Tribal Day 2023

tribal communities in maharashtra

World Tribal Day 2023 : दूर डोंगररांगांमध्ये किंवा रानावनांमध्ये अशी लोकवस्ती असते जी कायमच लक्ष वेधून जाते. ही वस्ती असते भूमिपुत्रांची, अर्थात त्या भागातील आदिवासींची. 

2/7

ठराविक भूभागाशी खास नातं

tribal communities in maharashtra

ठराविक भूभागाशी खास नातं असणाऱ्या या आदिवासी जमातीचं राहणीमान, त्यांची जीवनशैली, त्यांचे सणवार आणि इतकंच काय तर त्यांची भाषा आणि त्यांची खाद्यसंस्कृतीही तितकीच वेगळी. 

3/7

गावपाडे

tribal communities in maharashtra

महाराष्ट्रातही असेच विविध प्रकारचे गावपाडे आहेत जिथं आजही या आदिवासी जमाती नांदतात. 

4/7

गोंडवन

tribal communities in maharashtra

महाराष्ट्राच्या गोंडवन अर्थात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा भागात अशी वस्ती प्रामुख्यानं आढळते. इथं कोलाम, आंध, गोंड, परधान, हळबा हळबी, कावर, कोरकू, थोट्या थोटी, माडिया आणि राजगोंड अशा जमाती आढळतात.   

5/7

सातपुडा पर्वतरागा

tribal communities in maharashtra

राज्याच्या सातपुडा पर्वतरागांच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या धुळे, अमरावती, नंदुरबार आणि जळगाव मध्येही आदिवासी जमातींचा वावर आहे. इथं गावीत, गामीत, भिल्ल, धानका, पारधी, नायकडा, राठवा आणि कोकणा जमाती आढळतात.   

6/7

सह्याद्री

tribal communities in maharashtra

तिथे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर पुणे आणि नाशिक पट्ट्यामध्ये ढोर कोळी, कोकणा, वारली, कातकरी, दुबळा धोडिया, मल्हार कोळी , महादेव कोळी अशा आदिवासी जमाती आढळतात.   

7/7

अकोल्याचा पश्चिम भाग

tribal communities in maharashtra

राज्याच्या अकोला जिल्ह्याचा पश्चिम भागही तिथं असणाऱ्या आदिवासी वस्तीसाठी ओळखला जातो. मागील काही वर्षांमध्ये दळणवळणाची साधनं या वस्त्यांपर्यंत पोहोचल्यामुळं जगाशी आदिवासींना सहज संपर्कात राहणं शक्य होत आहे.