मुंबईत मराठी लोकांना 50% घरे आरक्षित ठेवणार का? बिल्डरनं तसं न केल्यास 10 लाखांचा दंड आणि 6 महिन्याची जेल होणार का?
Mumbai House Reservation: मुंबईत बांधण्यात येणा-या नव्या इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मुंबईत बांधण्यात येणा-या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50 टक्के घरे आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परबांनी केलीय. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून स्थलांतर होतंय. ते रोखण्यासाठी.


