ना कोणता सिनेमा, ना पॉलिटिकल करिअर... तरीही आलिशान आयुष्य कशी जगते उर्मिला मातोंडकर?
उर्मिला मातोंडकर 8 वर्षांचं वैवाहिक जीवन संपवत आहे. उर्मिला आणि मोहसिन घटस्फोट घेत आहे. या दरम्यान अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा होत आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या आपल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. उर्मिलाने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीरसोबत 2016 रोजी लग्न केलं होतं. उर्मिला सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. पण तिच्याकडे सध्या कोणताही सिनेमा नाही किंवा तिचं राजकीय करिअर देखील काही खास सुरु नाही. असं असताना अतिशय आलिशान आणि लक्झरी लाइफ उर्मिला मातोंडकर कशी जगतेय? हा प्रश्न अनेकांना पडत आहे.