'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे.
1/5

Job Opprtunities : अमुक एका वयात आल्यानंतर नोकरीच्या शोधात तरुणाई प्रयत्नांची पराकाष्ठा करते. (Jobs as per education) आपण घेतलेल्या शिक्षणाला साजेशी नोकरी, अपेक्षित पगार (salary) आणि मनाजोगी संस्था हे सारंकाही या नोकरीचा शोध घेताना पाहिलं जातं. पण, सध्याची कोलमडलेली अर्थव्यवस्था पाहता अनेकांवर मिळेल ती नोकरी करण्याची वेळ आली आहे. जागतिक (World recession) आर्थिक मंदीचं संकट असतानाही एक देश मात्र याला अपवाद ठरत आहे. काही काळापूर्वी (America) अमेरिकेत नोकऱ्यांचा तुटवडा जाणवत होता. पण, आता मात्र हा देश नोकऱ्या वाटत आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण इथे सध्याच्या घडीला एका व्यक्तीमागे सरासरी दोन नोकऱ्या उपलब्ध आहेत. US Jobs Data पाहता हे लक्षात येत आहे.
2/5

Forbes कडून हल्लीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये JOLTS च्या हवाल्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये एकूण 10.72 मिलियन इतक्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. हा आकडा 2022 सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. यामध्ये देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार नोकरीच्या संधी 4,37,000 नं वाढल्या आहेत.
3/5

4/5
