Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

कोरोनाच्या लसवरून अमेरिकेने दिला धक्का 

| Sep 02, 2020, 14:58 PM IST

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॅक्सीन तयार करण्यापासून ते अगदी त्याचं उत्पादन आणि मग वितरण करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आलं आहे. असं असताना आता अमेरिकेने इतर देशांना मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने यामध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला आहे. 

1/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

WHO च्या अंतर्गत ग्लोबल एक्सेस फॅसिलिटी (Covax) तयार करण्यात आली. कारण अनेक देश कोरोना व्हॅक्सीनच्या संदर्भात एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. आणि लवकरच यावर लस मिळेल. 

2/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

अमेरिका यामध्ये सहभागी होणार नाही कारण याचं नेतृत्व जागतिक आरोग्य संघटना करत आहे.  Coalition for Epidemic Preparedness Innovations आणि Gavi यांना WHO ने एकत्रच आणलेलं आहे. कोवॅक्सशी संपर्क येण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. 

3/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

गेल्या महिन्यात WHO ने म्हटलं होतं की, १७० देश कोवॅक्सच्या संपर्कात येण्यासाठी चर्चा करत आहे. कोवॅक्सचा उद्देश तोच आहे की, एकदा लस तयार झाली की, वेगवेगळ्या देशात सम प्रमाणात त्याचं वितरण केलं जाईल. 

4/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

मात्र अमेरिका हा एकमेव देश आहे जो लस तयार करण्यासाठी वेगळं काम करत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनातील प्रवक्तांनी सांगितलं की, अमेरिका कोरोनावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय देशांची साथ देईल मात्र भ्रष्ट जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या संघटनेचा भाग होणार नाही. 

5/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

अमेरिकेने स्वतःला WHO पासून वेगळं करण्याची घोषणा केली होती. तसेच निधीवर देखील बंधन आणली होती. या अगोदर अमेरिकाच WHO ला सर्वाधिक फंड देत असे. तिथेच तज्ज्ञांनी अमेरिका कोवॅक्समध्ये सहभागी होत नसल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.

6/6

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

Corona Vaccine च्या मुद्यावरून अमेरिकेचा संपूर्ण जगाला झटका

तज्ज्ञांच म्हणणं आहे की, अमेरिका स्वतः हे व्हॅक्सीन तयार करत आहे. तसेच इतर देशांना देखील असं करण्यास प्रवृत्त करत आहे. यामुळे व्हॅक्सीनवर निर्बंध येऊ शकतात. WHO चे असे म्हणणे आहे की, राष्ट्रवादातून आणखी प्रश्न निर्माण होऊ शकतात.