Vande Bharat Train : सर्वात कठीण अशा कसारा घाटात 'वंदे भारत ट्रेन'चा सराव; मुंबई ते शिर्डीचा प्रवास सुसाट

मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

Feb 05, 2023, 18:15 PM IST

Mumbai Shirdi Vande Bharat Express :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  या रेल्वेने इगतपुरी ते मुंबई ट्रायल करत आपल्या वेगवान प्रवासाचा सराव केला आहे. या प्रवासादरम्यान कसारा घाट सर्वात कठीण समजला जातो. नेहमीच्या एक्सप्रेसला पुढे आणि मागे दोन इंजिन लावावे लागतात. त्यामुळे वंदे भारत ट्रेन आपला वेगवान प्रवास किती कायम राखू शकते याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून घेतला गेला. 

1/6

 मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये तिकीट शुल्क आकारले जाऊ शकते. 

2/6

 वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.

3/6

मुंबई-शिर्डी ट्रेन 5.25 तासांत 340 किमी अंतर कापणार आहे. 

4/6

वंदे भारत एक्सप्रेस मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे धावणार आहे. 

5/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. 

6/6

 मुंबईतून हाजरो प्रवासी  शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी जातात.  या मार्गावर प्रवास करणाऱ्या भविकांसाठी  वंदे भारत एक्सप्रेस खूपच फायदेशीर ठरणार आहे.