14 दिवस साखर खाल्ली नाही तर काय होईल? हेल्थ एक्सपर्ट काय सांगतात?

साखर शरीरासाठी घातक असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे अनेकजण साखर सोडतात. पण तुम्ही 14 दिवस साखर खाल्ली नाहीत तर शरीरात काय बदल होतात? 

Jul 27, 2024, 19:23 PM IST

 

डाएट करत असाल तर शरीरातील साखर अतिशय महत्त्वाची असते. चहा-कॉफी, बिस्किट, ज्यूस, चॉकलेट, पॅकेट फूडमध्ये साखर असते. तसेच पदार्थाची चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर होतो. पण साखरेचे सेवन शरीरासाठी अतिशय घातक असते. कारण साखरेमुळे लठ्ठपणा, बीपी, मधुमेह आणि हृदयाशी संबंधीत अनेक आजार होतात. मात्र साखर 14 दिवस खाल्ली नाही तर प्रत्येक दिवशी काय बदल दिसेल ते जाणून घेऊया. 

1/8

दिवस 1ते3 मधील लक्षणे

पहिले 3 दिवस साखर सोडणे खूप कठीण आहे. ज्यामध्ये डोकेदुखी, पोटदुखी, थकवा यांसारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते, जी एक सामान्य गोष्ट आहे. तुमचे शरीर साखरेशिवाय राहू शकते हे याचे संकेत आहे. 

2/8

दिवस 4 ते 7 - ऊर्जा

चौथ्या दिवसापासून तुमचे शरीर पूर्णपणे फ्रेश वाटेल. यामुळे तुम्हाला पूर्णपणे उत्साही वाटेल. याशिवाय तुमची साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

3/8

दिवस 8 ते 10 पचनक्रिया

जसजसे तुम्ही साखर खाणे बंद कराल तसतसे तुमचे पचन सुधारण्यास सुरुवात होईल. बद्धकोष्ठता, सूज येणे आणि पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. 

4/8

दिवस 11 ते 14 भूक कमी लागणे

साखर सोडल्यानंतर दुसऱ्या आठवड्यानंतर तुमची मिठाई खाण्याची इच्छा कमी होईल आणि तुमच्या शरीराला बरे वाटेल. याशिवाय तुमच्या झोपेशी संबंधित समस्याही संपतील. 

5/8

साखर सोडण्याचे फायदे

रक्तातील साखर नियंत्रणात राहते  जर तुम्ही 14 दिवस साखर खाल्ली नाही तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वास्तविक साखरेमुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. अशा स्थितीत धोका कमी होती. जर साखर खाल्ली तर शरीरातील ब्लड शुगर अचानक वाढते. 

6/8

वजन कमी होते

साखर हे उच्च उष्मांक असलेले अन्न आहे. अशा परिस्थितीत जास्त साखरेचे सेवन केल्याने तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.  जर तुम्ही साखर खाणे बंद केले तर वजन वाढेल.

7/8

थकवा दूर होतो

साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढते. यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्त वाटू लागते. पण, जर तुम्ही साखरेचे सेवन बंद केले तर थकवा दूर होतो.   

8/8

इम्युनिटी वाढते

साखरेचे सेवन कमी केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य आजारांना बळी पडणे कमी होते.