Corporate FD मध्ये गुंतवू शकता पैसे, रिटर्न्स आणि जोखिमेबाबत; जाणून घ्या

FD Return: बँकेतील सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिलं जातं. गुंतवणुकीमुळे परताव्याची रक्कम देखील निश्चित असते. तसेच भांडवलही सुरक्षित असते. पण तुम्हाला याबाबत माहिती आहे का? कॉर्पोरेट एफडी देखील करता येते. चला जाणून घेऊयात. 

Nov 27, 2022, 18:10 PM IST
1/5

Corporate Fixed Deposit

कॉर्पोरेट एफडी ही टर्म डिपॉजिट आहे जी निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याज दरांवर ठेवली जाते. 

2/5

Corporate Fixed Deposit

कॉर्पोरेट मुदत ठेव वित्तीय आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे (NBFC) ऑफर केली जाते. कॉर्पोरेट एफडी काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत असू शकते.

3/5

Corporate Fixed Deposit

गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार, विविध कालावधी, व्याजदर आणि संस्थांमध्ये विविध कॉर्पोरेट मुदत ठेव पर्याय निवडले जाऊ शकतात. कॉर्पोरेट मुदत ठेव बँकांनी केलेल्या एफडीपेक्षा तुलनेने जास्त परतावा देते. तथापि, वेगवेगळ्या कंपन्यांनी देऊ केलेल्या व्याजदरात तफावत असू शकते.

4/5

Corporate Fixed Deposit

पैसे उभारण्यासाठी कंपन्या कॉर्पोरेट एफडी जारी करतात. बँक एफडींना व्यवस्थापित केलेल्या एकूण मालमत्तेचा आधार असतो. ही एफडी असुरक्षित असू शकते. कारण या ठेवींकडे परताव्याची हमी देण्यासाठी कोलेटरल किंवा मालमत्ता नसते.

5/5

Corporate Fixed Deposit

कोणतीही कॉर्पोरेट मुदत ठेव निवडण्यापूर्वी, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कॉर्पोरेट मुदत ठेव पूर्ण करताना, क्रेडिट रेटिंग, कंपनी पार्श्वभूमी आणि परतफेड इतिहास तपासणं आवश्यक आहे.